संतोष कानडे
झुरळ हा पृथ्वीवरील सर्वात टिकाऊ जीवांपैकी एक मानला जातो. कुठल्याही परिस्थितीत झुरळ जिवंत राहू शकतं.
वैज्ञानिकांच्या मते, झुरळाचे डोके कापले तरी ते अनेक दिवस जिवंत राहू शकते.
कारण झुरळ माणसांसारखे नाकाने श्वास घेत नाही, तर शरीरावरील सूक्ष्म छिद्रांद्वारे श्वास घेते.
त्यांची रक्ताभिसरण प्रणाली साधी असल्यामुळे डोके नसतानाही शरीर काही काळ कार्यरत राहते.
झुरळाचे मेंदूचे काही नियंत्रण शरीराच्या इतर भागांमध्येही असते.
त्यामुळे डोके नसतानाही त्याच्या पायांची हालचाल काही काळ सुरू राहू शकते.
मात्र डोके नसल्यामुळे ते पाणी आणि अन्न घेऊ शकत नाही.
अखेरीस तहान आणि उपासमारीमुळे झुरळाचा मृत्यू होतो.
काही संशोधनांनुसार झुरळ अणुकिरणांनाही इतर प्राण्यांपेक्षा जास्त सहन करू शकते.
म्हणूनच झुरळाला निसर्गातील सर्वात आश्चर्यकारक आणि जिवंत राहण्यात तरबेज जीव मानले जाते.