सकाळ डिजिटल टीम
जवळजास सर्वांचीच सकाळ ही चहाणे होते पण सकाळचा चहा तुच्या आरोग्यासाठी योग्य आहे का? सकाळी चहा पिणे आरोग्याठी योग्य ठरु शकते का जाणून घ्या.
चहामधील कॅफीनमुळे तुम्हाला त्वरित ऊर्जा मिळते आणि आळस कमी होण्यास मदत होते.
कॅफीन आणि एल-थियानाइन (L-theanine) यांसारख्या घटकांमुळे जागृत राहण्यास आणि एकाग्रता वाढवण्यास मदत होते.
काही अभ्यासानुसार, नियमित प्रमाणात चहा पिल्याने हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.
सकाळी चहा पिण्याचे जसे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत ते कोणते जाणून घ्या.
रिकाम्या पोटी चहा पिल्याने पोटात ऍसिड तयार होते, ज्यामुळे ऍसिडिटी, छातीत जळजळ आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
चहामधील कॅफीनमुळे लघवीचे प्रमाण वाढते, ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते.
चहातील टॅनिन नावाचा घटक लोहासारखी आवश्यक पोषक तत्त्वे शोषण्यास अडथळा निर्माण करतो.
एकंदरीत, सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जर तुम्हाला चहा प्यायची सवय असेल, तर सकाळी काहीतरी हलका आहार घेतल्यानंतर चहा प्यावा.