Yashwant Kshirsagar
सुके मासे आणि बोंबील हे प्रथिनांचे चांगले स्त्रोत असून, ते आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते.
पण काही लोकांसाठी सुके मासे हे विषासमान असतात अशा लोकांनी ते खाणे टाळावे. तर चला तर मग जाणून घेऊया सुके बोंबील आणि मासे कोणी खाऊ नये.
ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी सुके बोंबील आणि सुके मासे खाऊ नयेत. कारण यात मिठाचे प्रमाण जास्त असते.
ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी देखील सुके मासे आणि बोंबील खाऊ नये.
ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांनी याचे सेवन करु नये, माशांच्या काही प्रजातींमध्ये, पारा आणि शिसे यांसारखे जड धातूंचे प्रमाण जास्त असू शकते, जे शरीरात जमा होऊ शकतात आणि दीर्घकालीन आरोग्य समस्या निर्माण करू शकतात,
नेहमी गजकर्ण, अंगावर खाज, अंगावरील पित्ताची पुरळे ज्यांना होतात त्यांनीही याचे सेवन करु नये.
लहान मुलांनाही सुके बोंबील आणि सुके मासे खायला देऊ नये. खाऱ्या माशांमध्ये हिस्टामाइनचे प्रमाण जास्त असू शकते त्यामुळे लहान मुलांना विषबाधा होऊ शकते.
अस्वीकरण: वरील लेख इंटरनेटवरील उपलब्ध स्त्रोतांच्या आधारे देण्यात आली आहे. सकाळ याची पुष्टी करत नाही.