'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मध्ये सध्या काय घडतंय?

संतोष कानडे

प्रवास

युद्ध सुरू असताना 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' या जगातील सर्वात अरुंद आणि संवेदनशील सागरी मार्गावरून प्रवास करणे जोखमीचं होतं.

ड्रोन

इराणचे नौदल आणि येमेनचे हुथी बंडखोर या मार्गावरून जाणाऱ्या पाश्चात्य देशांच्या तेलवाहू जहाजांवर कधीही ड्रोन, आत्मघाती बोटी किंवा अँटी-शिप बॅलिस्टिक मिसाईल्सने हल्ला करू शकत होते.

सायबर हल्ले

युद्धकाळात या सागरी क्षेत्रात प्रचंड प्रमाणावर 'जीपीएस स्पूफिंग' आणि जॅमिंग केले जात होते, ज्यामुळे जहाजे खडकांवर आदळण्याचा धोका असायचा.

रडार

जहाजावरील सुरक्षा यंत्रणा आणि कॅप्टन २४ तास रडार स्क्रीनवर डोळे लावून असायचे; समुद्रात किंवा हवेत झालेली लहानशी हालचालही जीवघेणा हल्ला असू शकत होती.

गनिमी कावा

इराणचे कमांडो अनेकदा स्पीड-बोटींचा वापर करून गनिमी काव्याने अचानक जहाजांच्या जवळ यायचे आणि हेलिकॉप्टरमधून थेट जहाजाच्या डेकवर उतरून जहाजे जप्त करायचे.

'ब्लॅकआउट'

शत्रूच्या रडार आणि सॅटेलाईटच्या नजरेतून वाचण्यासाठी अनेक जहाजांचे कॅप्टन आपले ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टम ट्रॅकर्स बंद करून प्रवास करायचे.

सुरक्षा कवच

या थरारक प्रवासात व्यापारी जहाजांना एकटे सोडले जात नव्हते; अमेरिका, ब्रिटन आणि भारतीय नौदलाची विनाशिका युद्धजहाजे त्यांना विशेष एस्कॉर्ट आणि सुरक्षा कवच पुरवत असत.

पहारा

हा अरुंद पट्टा पार करण्यासाठी लागणाऱ्या ३ ते ४ तासांच्या काळात जहाजावरील कॅप्टन आणि क्रू मेंबर्स बुलेटप्रूफ जॅकेट आणि हेल्मेट घालून २४ तास सलग जागे राहून पहारा द्यायचे.

धोका

या भीषण धोक्यामुळे जहाज कंपन्यांना आपल्या कॅप्टन आणि कर्मचाऱ्यांना 'वॉर झोन अलाउन्स' द्यावा लागायचा आणि जहाजांचा विमा खर्च तब्बल ४०० टक्क्यांनी वाढला होता.

वैद्यकीय क्रांती! लक्षणे दिसण्याआधीच ५० प्रकारचे कॅन्सर ओळखणारी टेस्ट

<strong>येथे क्लिक करा</strong>