Tadgola Fruit Benefits : कर्करोग आणि हृदयविकारापासूनही करणार रक्षण! उन्हाळ्यातील 'हे' खास फळ आहे गुणधर्मांची खाण; आजच आहारात करा समावेश

बाळकृष्ण मधाळे

फळं शरीराला देतात पोषक घटक

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहारात हंगामी फळांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. कारण, ही फळं शरीराला आवश्यक पोषक घटक देण्यास मदत करतात.

What is Tadgola or Ice Apple?

|

esakal

खास आणि चविष्ट फळ

काही फळं तर वर्षातून केवळ ठराविक दिवसांसाठीच बाजारात उपलब्ध होतात. अशाच खास आणि चविष्ट फळांपैकी एक म्हणजे ताडगोळं.

What is Tadgola or Ice Apple?

|

esakal

उन्हाळ्यात विशेष लोकप्रिय

ताडाच्या झाडावर येणारं हे फळ उन्हाळ्यात विशेष लोकप्रिय ठरतं. पाण्याचं प्रमाण अधिक असल्याने ताडगोळं खाल्ल्यानंतर शरीराला थंडावा मिळतो.

What is Tadgola or Ice Apple?

|

esakal

देशातील विविध भागांत आढळते

त्यामुळे उकाड्याच्या दिवसांत अनेकजण आवर्जून हे फळ खाताना दिसतात. देशातील विविध भागांत या फळाला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. काही ठिकाणी त्याला ‘तारकून’ असंही म्हटलं जातं.

What is Tadgola or Ice Apple?

|

esakal

ताडगोळ्याचं बाहेरील कवच कठीण

ताडगोळ्याचं बाहेरील कवच कठीण असलं तरी आतून ते अतिशय मऊ आणि नाजूक असतं. वरची साल काढल्यानंतर हे फळ हातातून सहज निसटतं. त्यामुळे त्याची मजा घेण्यासाठी थोडी काळजी घ्यावी लागते.

What is Tadgola or Ice Apple?

|

esakal

ताडगोळे घेताना योग्य निवड आवश्यक

गोड आणि रसाळ चवीमुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे फळ आवडतं. मात्र, बाजारात ताडगोळे घेताना योग्य निवड करणं महत्त्वाचं असतं.

What is Tadgola or Ice Apple?

|

esakal

ताडगोळे गोड आणि मऊ असतात

सर्वच ताडगोळे गोड आणि मऊ असतात असं नाही. काही फळं कडक किंवा बेचवही निघू शकतात. त्यामुळे खरेदी करताना ते नीट तपासून घेणं गरजेचं आहे.

What is Tadgola or Ice Apple?

|

esakal

आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर

आरोग्याच्या दृष्टीनेही ताडगोळं अत्यंत फायदेशीर मानलं जातं. पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि पोट साफ होण्यासाठी हे फळ उपयुक्त ठरतं. यामध्ये विविध जीवनसत्त्वे आणि पोषक घटक आढळतात.

What is Tadgola or Ice Apple?

|

esakal

शरीराला देते ऊर्जा

तसेच शरीराला ऊर्जा देण्याबरोबरच हृदयविकार आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळण्यासही मदत होऊ शकते.

What is Tadgola or Ice Apple?

|

esakal

Vitamin D Deficiency : हाडे ठिसूळ होण्यापूर्वीच सावध व्हा! Vitamin D च्या कमतरतेमुळे जडतात 'हे' 7 गंभीर आजार

Vitamin D Deficiency

|

esakal

येथे क्लिक करा...