Vitamin D Deficiency : हाडे ठिसूळ होण्यापूर्वीच सावध व्हा! Vitamin D च्या कमतरतेमुळे जडतात 'हे' 7 गंभीर आजार

बाळकृष्ण मधाळे

व्हिटॅमिन डीची कमतरता वाढतेय

आजच्या धावपळीच्या जीवनात सूर्यप्रकाशापासून दूर राहणे आणि असंतुलित आहार घेणे यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. ही कमतरता शरीराच्या अनेक महत्त्वाच्या कार्यांवर परिणाम करू शकते.

Vitamin D Deficiency

|

esakal

हाडांवर होणारे दुष्परिणाम

व्हिटॅमिन डी शरीरात कॅल्शियमचे शोषण सुधारण्यास मदत करते. याची कमतरता असल्यास हाडे कमकुवत होतात, तसेच ऑस्टिओपोरोसिस (हाडे ठिसूळ होणे) आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो.

Vitamin D Deficiency

|

esakal

रोगप्रतिकारशक्ती कमी होणे

हे व्हिटॅमिन शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. कमतरतेमुळे सर्दी, फ्लू आणि विविध संसर्गजन्य आजार सहज होण्याची शक्यता वाढते.

Vitamin D Deficiency

|

esakal

थकवा आणि अशक्तपणा

सतत थकवा जाणवणे, ऊर्जेचा अभाव आणि स्नायूंमध्ये कमजोरी जाणवणे ही व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची सामान्य लक्षणे आहेत.

Vitamin D Deficiency

|

esakal

मानसिक आरोग्यावर परिणाम

संशोधनानुसार, व्हिटॅमिन डीची कमतरता नैराश्य, चिडचिड, उदासीनता आणि मनःस्थितीत बदल यांस कारणीभूत ठरू शकते.

Vitamin D Deficiency

|

esakal

केस गळण्याची समस्या

व्हिटॅमिन डी केसांच्या मुळांना बळकट ठेवण्यास मदत करते. त्याच्या अभावामुळे केस गळणे वाढते आणि केस पातळ होऊन तुटू लागतात.

Vitamin D Deficiency

|

esakal

मधुमेहाचा वाढता धोका

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे रक्तातील साखरेचे संतुलन बिघडू शकते, ज्यामुळे टाईप २ मधुमेहाचा धोका वाढतो.

Vitamin D Deficiency

|

esakal

हृदयविकाराचा धोका

या व्हिटॅमिनच्या अभावामुळे रक्तदाबावर आणि हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.

Vitamin D Deficiency

|

esakal

व्हिटॅमिन डीची कमतरता टाळण्यासाठी का करावे?

व्हिटॅमिन डीची कमतरता टाळण्यासाठी दररोज काही वेळ सूर्यप्रकाशात राहणे, संतुलित आहार घेणे आणि आवश्यक असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घेणे गरजेचे आहे.

Vitamin D Deficiency

|

esakal

Why Cancer Risk Increases With Age : कर्करोग कोणत्या वयात सर्वाधिक आढळतो?

Why Cancer Risk Increases With Age

|

esakal

येथे क्लिक करा...