सकाळ डिजिटल टीम
मायग्रेन ही एक न्यूरोलॉजिकल समस्या आहे, ज्यामध्ये डोक्याच्या अर्ध्या भागात तीव्र वेदना होतात. या मायग्रेनपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता.
त्रिफळा शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि पचन सुधारते. दररोज रात्री कोमट पाण्यासोबत त्रिफळा घेतल्याने मायग्रेनच्या वेदनांपासून आराम मिळतो.
तुळस व आले वेदना आणि ताण कमी करतात. हे दोन्ही एक कप गरम पाण्यात उकळून दिवसातून दोनदा प्यायल्याने मायग्रेनच्या वेदनांपासून आराम मिळतो.
ब्राह्मी शरीरातील उष्णता थंड करते आणि मायग्रेनपासून आराम देते. रात्री झोपण्यापूर्वी ब्राम्ही चहा प्यायल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो.
नारळ पाणी शरीराला हायड्रेट ठेवते आणि हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करते. आठवड्यातून १-२ वेळा याचे सेवन केल्याने मायग्रेन टाळण्यास मदत होते.
गाईचे तूप पित्त संतुलित करते. मायग्रेनच्या वेदना झाल्यास, त्याचे दोन थेंब नाकात टाकल्याने किंवा जेवणात मिसळल्याने खूप आराम मिळतो.
मायग्रेनच्या रुग्णांनी जास्त मसालेदार पदार्थ आणि तळलेले पदार्थ टाळावेत. या गोष्टींमुळे शरीरातील उष्णता वाढून मायग्रेनचा त्रास होतो.