सकाळ डिजिटल टीम
उन्हाळ्यात लिंबू पाणी पिणे फायदेशीर मानले जाते. खरंतर, लिंबू पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता होत नाही. लिंबू पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती आहे, ते जाणून घेऊया..
जर तुम्ही उन्हाळ्यात लिंबू पाणी पीत असाल तर ते योग्य वेळी पिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून शरीराला त्याचा पूर्ण फायदा होईल. या ऋतूत लिंबू पाणी वेगवेगळ्या वेळी पिले जाऊ शकते.
उन्हाळ्यात रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिणे फायदेशीर असते. यावेळी लिंबू पाणी पिल्याने पोट स्वच्छ होते आणि शरीरातील घाण निघून जाते.
उन्हाळ्यात दुपारी लिंबू पाणी प्यावे. दुपारी लिंबू पाणी पिल्याने उष्माघातापासून बचाव होतो आणि शरीर हायड्रेट राहते.
जेवण करण्यापूर्वी ३० मिनिटे आधी तुम्ही लिंबू पाणी पिऊ शकता. लिंबू पाणी पिण्यासाठी हा काळ चांगला मानला जातो.
उन्हाळ्यात लिंबू पाणी पिणे फायदेशीर आहे; पण दिवसातून २ ते ३ ग्लासपेक्षा जास्त लिंबू पाणी पिऊ नये.
रात्री झोपण्यापूर्वी लिंबू पाणी पिऊ नये, कारण त्यामुळे आम्लपित्त किंवा वारंवार लघवी होऊ शकते.