रात्री दही का टाळावे?

सकाळ डिजिटल टीम

दही

रात्रीची वेळ दही खाण्यासाठी योग्य आहे का? रात्री दही खाणे का टाळायला हवे जाणून घ्या.

curd | sakal

कफदोष

आयुर्वेदानुसार दही हे कफ वाढवणारे असते. रात्रीच्या वेळी शरीरात नैसर्गिकरित्या कफ वाढलेला असतो. त्यामुळे रात्री दही खाल्ल्यास कफदोष अधिक वाढतो, ज्यामुळे सर्दी, खोकला, दमा आणि सायनससारख्या समस्या वाढू शकतात.

curd | sakal

पचनसंस्था

दही पचायला जड असते. रात्रीच्या वेळी आपली पचनसंस्था तुलनेने कमी सक्रिय असते. त्यामुळे दही खाल्ल्यास पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे अपचन, पोट फुगणे किंवा बद्धकोष्ठता अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

curd | sakal

सांधेदुखी

ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे, त्यांनी रात्री दही खाणे पूर्णपणे टाळावे. दह्यामुळे सांध्यांमधील सूज आणि वेदना वाढू शकतात.

curd | sakal

जास्त ऊर्जा

काही अभ्यासानुसार, रात्री दही खाल्ल्याने सकाळी उठल्यावर थकल्यासारखे वाटू शकते, कारण ते पचवण्यासाठी जास्त ऊर्जा लागते.

curd | sakal

गाढ झोप

पचनास जड असल्यामुळे, दही खाल्ल्यानंतर पोटात अस्वस्थता जाणवते. यामुळे गाढ झोप लागण्यास अडथळा येऊ शकतो.

curd | sakal

नकारात्मक ऊर्जा

आयुर्वेदानुसार, दही आंबट असल्यामुळे ते रात्रीच्या वेळी शरीरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकते, ज्यामुळे शरीरातील नैसर्गिक संतुलनावर परिणाम होवू शकतो.

curd | sakal

जळजळ

दहीमध्ये नैसर्गिकरित्या आम्ल (ऍसिड) असते. रात्री दही खाल्ल्यास छातीत जळजळ (ऍसिडिटी) किंवा ऍसिड रिफ्लक्सची समस्या होऊ शकते.

curd | sakal

सल्ला

या सर्व कारणांमुळे, रात्री दही खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्हाला दही खावेच वाटत असेल, तर ते जेवणासोबत किंवा दिवसा खावे.

curd | sakal

दोडक्याची भाजी पाहून नाक मुरडण्याआधी जाणून घ्या 8 आश्चर्यकारक फायदे

येथे क्लिक करा