सकाळ डिजिटल टीम
दोडका हे एक पचायला सोपे आणि हलके फळभाजी आहे. यामध्ये व्हिटॅमिन C, A, B, कॅल्शियम, पोटॅशियम आणि अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात.
दोडक्यात असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करते. हे हृदयविकाराचा झटका आणि हृदयासंबंधी समस्या कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
रोजच्या आहारात दोडक्याचा समावेश केल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात जे शरीराला निरोगी ठेवतात.
दोडक्यात पेप्टाइड आणि एल्कलॉइड घटक असतात, जे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित करतात आणि मेटाबॉलिजम वाढवतात. मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी हे अत्यंत फायदेशीर आहे.
दोडक्यात कमी कॅलोरी आणि अधिक फायबर असतो, जे पोट भरलेले ठेवते आणि वजन नियंत्रणात मदत करते.
दोडका व्हिटॅमिन A, B, C आणि इतर पौष्टिक द्रव्यांनी समृद्ध असतो, ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि डोळ्यांसंबंधी आजारांचा धोका कमी होतो.
सतत पाय दुखणे, पोट फुगणे, आणि थकवा येणे यासारख्या समस्यांमध्ये दोडक्याच्या फोडी किंवा भाजी खाल्ल्याने आराम मिळतो.
जर चेहऱ्यावर मुरुम किंवा पुरळ असतील, तर दोडक्याची भाजी खाल्ल्याने शरीरातील घाण दूर होईल आणि त्वचेवरील डाग आणि पुरळ कमी होतात.
बद्धकोष्ठता आणि डिहायड्रेशनची समस्या दूर करण्यासाठी दोडका खाणे उपयुक्त ठरते. तसेच, कफ आणि पित्त कमी करण्यास देखील मदत होत