सकाळ डिजिटल टीम
आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते, कांदा अनेक आरोग्यदायी फायदे देतो. हा केवळ आरोग्य सुधारण्यासाठीच नव्हे, तर सौंदर्य सुधारण्यास देखील मदत करतो.
कांदा अन्न पचवण्यास खूप मदत करतो. याचे सेवन केल्याने अन्न सहज पचते, ज्यामुळे गॅस आणि अपचनाची समस्या टाळता येते.
कांदा खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी येते; पण ते पचनासाठी खूप प्रभावी मानले जाते.
अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे, की कांदा हा प्रोबायोटिकचा एक उत्कृष्ट स्रोत आहे, जो रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतो.
कांद्याच्या सेवनाने विषाणूजन्य संसर्गाचा धोका कमी होतो.
कांदा हा लोह, फोलेट आणि पोटॅशियमचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो.
लोहाची कमतरता दूर करण्यासाठी आपल्या आहारांत कांद्याचा समावेश करावा.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.