सकाळ डिजिटल टीम
हिवाळा सुरू झाला आहे आणि बाजारपेठ विविध हिरव्या भाज्यांनी गजबजलेली दिसत आहे. त्यामध्ये वाटाणे ही अशी भाजी आहे, जी जवळजवळ प्रत्येकाला आवडते.
Peas Side Effects
esakal
बटाटे, गाजर किंवा इतर हिवाळ्यातील पदार्थांमध्ये वाटाणे पोषणाचा उत्कृष्ट स्रोत ठरतात.
Peas Side Effects
esakal
पण, काही लोकांसाठी वाटाण्याचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. खाली दिलेल्या व्यक्तींनी वाटाणे खाणे मर्यादित ठेवणे किंवा पूर्णपणे टाळणे आवश्यक आहे.
Peas Side Effects
esakal
वाटाण्यामध्ये प्रथिने आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते.
हे दोन घटक मूत्रपिंडांवर अतिरिक्त ताण आणू शकतात.
म्हणूनच, कमकुवत किडनी असलेल्या किंवा किडनी रुग्णांनी वाटाण्यांचे जास्त सेवन टाळावे.
Peas Side Effects
esakal
वाटाण्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि कॅलरीचे प्रमाण जास्त असते.
ज्यामुळे जास्त खाल्ल्यास वजन वाढण्याची शक्यता असते.
वजन कमी करत असाल तर वाटाणे मर्यादित प्रमाणातच खावेत.
Peas Side Effects
esakal
वाटाणेमधील जास्त फायबर पचण्यास वेळ लागतो.
यामुळे गॅस, पोटफुगी आणि अॅसिडिटीचा त्रास वाढू शकतो.
अशा लोकांनी वाटाणे कमी खावेत.
Peas Side Effects
esakal
वाटाण्यामध्ये प्युरीन असते, जे शरीरातील युरिक अॅसिडची पातळी वाढवते.
म्हणूनच संधिवात, सांधेदुखी किंवा उच्च यूरिक अॅसिड असणाऱ्यांनी वाटाण्यांचे सेवन मर्यादित ठेवावे.
Peas Side Effects
esakal
Dry Ginger Water Benefits
esakal