तीळ खा आणि हिवाळ्यात 'या' गंभीर आजारांना दूर ठेवा

सकाळ डिजिटल टीम

तिळ

हिवाळ्यात रोज तिळ खाल्यास कोणत्या आजारांचा धोका टाळता येतो जाणून घ्या.

sesame seeds benefits

|

sakal

हाडांची कमजोरी

तीळ कॅल्शियमचा (Calcium) उत्तम स्रोत आहेत. रोज तीळ खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि थंडीत कटकट वाजणाऱ्या सांधेदुखीमध्ये आराम मिळतो, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होण्यास मदत दोते.

sesame seeds benefits

|

sakal 

हृदयविकाराचा धोका

तिळात ओमेगा-६ फॅटी ऍसिडस् आणि निरोगी चरबी असतात, तसेच सेसामिन आणि सेसामोल सारखे संयुगे असतात. हे घटक कोलेस्टेरॉलची पातळी आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

sesame seeds benefits

|

sakal 

उच्च रक्तदाब

तिळातील मॅग्नेशियम रक्तवाहिन्या शिथिल करण्यास मदत करते, ज्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि स्ट्रोकचा (Stroke) धोका कमी करण्यास मदत होते.

sesame seeds benefits

|

sakal 

पचनाचे विकार

तिळात फायबरचे (Fiber) प्रमाण चांगले असते. यामुळे पचनक्रिया सुधारते, आतड्यांमधील कोरडेपणा कमी होतो आणि हिवाळ्यात सामान्यपणे होणारी बद्धकोष्ठता (Constipation) दूर ठेवण्यास मदत होते.

sesame seeds benefits

|

sakal 

ॲनिमियाचा धोका

काळ्या तिळामध्ये लोहाचे (Iron) प्रमाण जास्त असते. याचे नियमित सेवन केल्याने शरीरात हिमोग्लोबिनची पातळी वाढते, ज्यामुळे ॲनिमियासारख्या गंभीर आजारापासून बचाव होतो.

sesame seeds benefits

|

sakal 

रोगप्रतिकारशक्ती वाढते

तिळात झिंक आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, ज्यामुळे हिवाळ्यात होणारे सर्दी, खोकला आणि फ्लूपासून संरक्षण मिळते.

sesame seeds benefits

|

sakal 

कर्करोगाचा धोका

तिळामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स, विशेषतः सेसामिन, हे शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात.

sesame seeds benefits

|

sakal 

दातांचे आरोग्य

कॅल्शियमचा चांगला स्रोत असल्याने तीळ दातांच्या आणि हिरड्यांच्या मजबुतीसाठी उपयुक्त ठरू शकते.

sesame seeds benefits

|

sakal 

ज्वारी, भाजरी आणि मका: हिवाळ्यात कोणती भाकरी खावी?

येथे क्लिक करा