स्वाद आणि आरोग्य एकत्र! एअर फ्रायरमध्ये बनवा 'हे' 8 सुपर पदार्थ

Monika Shinde

एअर फ्रायर

आजकाल एअर फ्रायर ही एक उपयुक्त आणि लोकप्रिय किचनमध्ये असलेली वस्तू बनली आहे. यामध्ये आपण कमी तेलात झटपट आणि आरोग्यदायी पदार्थ बनवू शकतो. चला तर, अशाच काही सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज पाहूया

भाज्यांचे कुरकुरीत चिप्स

गाजर, बटाटा, बीट यांसारख्या आवडत्या भाज्या घ्या, थोडं ऑलिव्ह तेल, मीठ, मिरे आणि हर्ब्स टाका. एअर फ्रायरमध्ये कुरकुरीत होईपर्यंत शिजवा. चवदार आणि हेल्दी स्नॅक

फलाफल बॉल्स

हरभरा डाळ , लसूण, हळद, मसाले आणि कोथिंबीर मिक्स करून लहान बॉल्स तयार करा. एअर फ्रायरमध्ये खरपूस भाजा. ही डिश प्रोटीनने भरलेली आणि शाकाहारी आहे.

गोड बटाट्याचे फ्राय

गोड बटाट्याचे तुकडे करा आणि त्यात थोडे तेल, गोड आणि मसाले घाला. एअर फ्रायरमध्ये कुरकुरीत होईपर्यंत तळा. फ्राईज हेल्दी आणि खूप चविष्ट असतात.

भरलेले बेल पेपर्स

शिमला मिरच्याच्या फोडींमध्ये क्विनोआ, बीन्स, थोड्या भाज्या आणि मसाल्यांचं मिश्रण भरून फ्रायरमध्ये शिजवा. पौष्टिक आणि पोटभरीचं जेवण.

सॅल्मन फिश

सॅल्मन फिशला, लिंबाचा रस, लसूण आणि औषधी वनस्पतींसह काही वेळ मॅरीनेट करून नंतर एअर फ्रायरमध्ये तळलेले. प्रथिने आणि ओमेगा-३ ने भरलेला निरोगी पर्याय.

मोजरेला चीज स्टिक्स

मोजरेला चीजच्या पट्ट्या अंड्यात बुडवून ब्रेडक्रंबमध्ये घोळवून एअर फ्रायरमध्ये कुरकुरीत होईपर्यंत भाजा. खूप टेस्टी आणि पार्टीसाठी योग्य स्नॅक

उकडलेली अंडी

अंडी एअर फ्रायरमध्ये १०-१२ मिनिटं ठेवा. सॉफ्ट किंवा हार्ड बॉईल अंडी तयार होतील. झटपट नाश्त्यासाठी परफेक्ट

झुकीनीचे चिप्स

झुकीनीचे पातळ तुकडे करून त्यात थोडं तेल, मीठ आणि मसाले टाका. एअर फ्रायरमध्ये कुरकुरीत होईपर्यंत भाजा. कमी कॅलोरी आणि हेल्दी चिप्स

साडीमध्ये जाड दिसायचं नाहीये? घ्या फॅशन टिप्स

येथे क्लिक करा