फक्त ५ मिनिटांत बनवा! लहान मुलांसाठी पौष्टिक आणि स्वादिष्ट सुंडल रेसिपी

Aarti Badade

मुलांना पौष्टिक जेवण

मुलांना पौष्टिक जेवण देण्यासाठी तुम्ही अनेकदा प्रयत्न करत असाल, पण ते खाण्यासाठी तयार नसतात. अशी एक सोपी आणि चविष्ट रेसिपी घेऊन आलो आहोत, जी मुले आवडीने खातील.

green moong recipe sundal

|

Sakal

सुंडल (हिरव्या मुगाची उसळ) बनवण्यासाठी साहित्य

२ वाटी हिरवे मूग (भिजवलेले), १ वाटी ओले खोबरे, ३-४ हिरव्या मिरच्या, ३ चमचे तेल, १ चमचा जिरे, चवीनुसार मीठ, आणि कोथिंबीर.

green moong recipe sundal

|

Sakal

मूग शिजवून घ्या

सर्वप्रथम, ३-४ तास भिजवलेले हिरवे मूग कुकरमध्ये दोन शिट्ट्या देऊन शिजवून घ्या. मूग जास्त शिजणार नाहीत याची काळजी घ्या.

green moong recipe sundal

|

Sakal

फोडणीची तयारी

आता एका कढईत तेल गरम करा. त्यात जिरे आणि हिरव्या मिरच्या घालून फोडणी तयार करा. तुम्ही यात कढीपत्ताही टाकू शकता.

green moong recipe sundal

|

Sakal

मूग परतून घ्या

फोडणी झाल्यावर त्यात शिजवलेले हिरवे मूग घाला. हे मिश्रण चांगले परतून घ्या, जेणेकरून फोडणीचा स्वाद मूगांमध्ये चांगला मिसळेल.

green moong recipe sundal

|

Sakal

खोबरे आणि मीठ घाला

मूग परतल्यावर त्यात ओले खोबरे आणि चवीनुसार मीठ घाला. सर्व साहित्य चांगले मिक्स करून एक-दोन मिनिटे शिजवा.

green moong recipe sundal

|

Sakal

गरमागरम सुंडल खाण्यासाठी तयार!

सजावटीसाठी वरून कोथिंबीर आणि थोडे ओले खोबरे घालून गरमागरम सुंडल सर्व्ह करा. हा पदार्थ पचायला हलका आणि खूप चविष्ट असतो!

green moong recipe sundal

|

Sakal

उपवासात सेंधा मीठ का वापरतात? जाणून घ्या त्याचे 5 आरोग्यदायी फायदे!

Health Benefits of Eating Rock Salt

|

Sakal

येथे क्लिक करा