Aarti Badade
आरोग्यदायी गोडाचा पर्याय! साखर-गूळ नाही, नैसर्गिक गोडपणासह स्वादिष्ट ड्राय फ्रूट मोदक बनवा
बदाम, काजू, पिस्ता (बारीक कापलेले),खजूर (बिया काढलेले, वाटलेले),खवलेले खोबरे,तूप,वेलची पूड.
ड्राय फ्रूट्स बारीक कापून घ्या.खजूरच्या बिया काढून मिक्सरमध्ये वाटा
कढईत तूप गरम करा. त्यात खजूर घालून मऊ होईपर्यंत परता
खजूरात बारीक ड्राय फ्रूट्स + खवलेले खोबरे घाला. वेलची पूड टाका व छान परता
मोदकाच्या साच्यात हे सारण भरा,सुंदर पौष्टिक मोदक तयार!
नैसर्गिक गोडपणा (खजूर),प्रोटीन आणि फायबरयुक्त,सणासाठी परफेक्ट आरोग्यदायी पर्याय
गणेशोत्सवात बाप्पाला नक्कीच नैसर्गिक गोडपणाचे ड्राय फ्रूट मोदक अर्पण करा!