Monika Shinde
अंडी हे प्रथिने आणि पोषणाने भरलेले अन्न आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का अंड्याबरोबर कोणते पदार्थ खाल्ल्यास त्याची चव आणि पौष्टिकता अधिक वाढते? चला तर मग, जाणून घेऊया
टोमॅटोच्या नैसर्गिक चवेमुळे अंडी अधिक चविष्ट बनतात. त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात
कांद्यामुळे अंड्याला खास आणि चवदार स्वाद मिळतो. अंडीसोबत कांदा खाल्ल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
पालकामध्ये भरपूर लोह आणि जीवनसत्त्वे असतात, जे शरीरासाठी उपयुक्त ठरतात. अंड्यांसोबत पालक खाल्ल्यास ऊर्जा आणि ताकद वाढण्यास मदत होते.
थोडीशी तिखट मिरची अंड्याच्या चवेला झणझणीतपणा देते, पण ती प्रमाणातच वापरणे आवश्यक आहे.
अंडी ब्रेड किंवा पराठ्यासोबत खाल्ल्यास अधिक काळ ऊर्जा टिकते आणि चवही लज्जतदार लागते.
चीजसह अंडी बनविल्यास त्याची चव अधिक समृद्ध होते आणि प्रथिनांचं प्रमाणही वाढतं. तुम्हाला चीज आवडत असेल, तर हा एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पर्याय ठरू शकतो.
बटाटा आणि अंडी एकत्र शिजवल्यास चविष्ट, पौष्टिक आणि पोटभर जेवण तयार होतं.