Anushka Tapshalkar
उन्हाळा सुरु झाला की लहान मुलांना आईस्क्रिम, बर्फाचा गोळा आणि कोल्ड ड्रींक्स हवे असतात.
परंतु कोल्ड ड्रिंक आरोग्यासाठी अपायकारक असते. त्याऐवजी मुलांना नैसर्गिक फळांचे ज्यूस द्या.
उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता टाळण्यासाठी हायड्रेटेड राहणे गरजेचे आहे.
संत्र्याचा रस व्हिटॅमिन C ने समृद्ध असून, तो मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि हायड्रेटेड ठेवतो. उन्हाळ्यात हा ज्यूस दिल्यास मुलं दिवसभर ताजेतवाने राहतील.
उन्हाळ्यात मुलांसाठी कलिंगडाचा रस सर्वोत्तम पर्याय आहे. तो भरपूर पाणीयुक्त असल्याने हायड्रेटेड ठेवतो, पोटाला थंडावा देतो आणि व्हिटॅमिन C व लाइकोपीनमुळे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.
उन्हाळ्यात पपईचा रस उत्तम पर्याय आहे. पपईतील पपेन एंजाइम पचनास मदत करतो, तर व्हिटॅमिन C आणि पोटॅशियम आरोग्यासाठी लाभदायी आहेत. हा रस मुलांना सकाळ-संध्याकाळ देता येऊ शकतो.
द्राक्षाचा रस सॉफ्ट ड्रिंक्सपेक्षा उत्तम पर्याय आहे. तो पोटॅशियम व व्हिटॅमिन C ने समृद्ध असून हायड्रेटेड ठेवतो. मात्र, ज्यूस ताजा आणि स्वच्छ तयार करूनच मुलांना द्यावा. परंतु डॉक्टरांचा सल्ला घेऊनच मुलांना द्यावा.
बाजारातील पॅक ज्यूसऐवजी घरच्या घरी ताज्या फळांचा ज्यूस बनवून मुलांना दिल्यास त्यांचे आरोग्यही टिकून राहते आणि त्यांची थंडगार पिण्याची हौस पूर्ण होते.
मुलांना कोणताही नवीन ज्यूस देण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.