Anushka Tapshalkar
सध्या उन्हाळ्याच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सगळीकडे रसवंत्या, कलिंगड आणि बर्फाच्या गोळ्याच्या गाड्याही दिसू लागल्या आहेत. कडक सूर्यप्रकाश आणि उष्णतेमुळे तहाण लागणे आणि थकवा जाणवणे नॉर्मल आहे.
योग्य पेये घेतल्यास उन्हाळ्यातील उष्णतेचा सामना सहज करता येतो. हायड्रेशन महत्त्वाचे असून काही पेये आरोग्य व ताजेपणा टिकवतात. चला, अशी पेये जाणून घेऊया!
लिंबूपाणी लोकप्रिय आणि प्रभावी पेय आहे. हे हायड्रेशन राखते, पचन सुधारते, त्वचेसाठी फायदेशीर असून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते.
उन्हाळ्यासाठी कलिंगडाचा रस उत्तम पर्याय आहे. यामध्ये 90% पाणी असून तो हायड्रेशनसाठी उपयुक्त आहे. तसेच, त्यातील लाइकोपीन त्वचेला सूर्याच्या हानीपासून वाचवतो.
नारळपाणी एक नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट असून ते शरीर हायड्रेट ठेवते, ऊर्जा वाढवते आणि उन्हाळ्यात ताजेतवाने ठेवते.
ताक प्रथिने व कॅल्शियमयुक्त असून हाडे व पचनासाठी लाभदायक आहे. थंड ताक पोटाची उष्णता कमी करून शरीर ताजेतवाने ठेवते.
तुळशीच्या बिया अँटीऑक्सिडंट्स व फायबरयुक्त असून शरीर थंड ठेवतात व पचन सुधारतात. उन्हाळ्यात पाण्यात भिजवून प्यायल्याने ताजेपणा राहतो आणि चिडचिड कमी होते.
पेरूचा रस केवळ चवदारच नाही तर शरीरासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. पेरू व्हिटॅमिन C समृद्ध असल्याने त्याचा रस त्वचेला संरक्षण देतो व रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो.
गुलाबपाणी उत्तम नैसर्गिक टोनर असून ते हायड्रेशनसाठीही उपयुक्त आहे. उन्हाळ्यात थंड गुलाबपाणी प्यायल्याने ताजेतवाने वाटते आणि डोकेदुखी कमी होते.