सकाळ डिजिटल टीम
तुम्हाला ही जर तुमचे हृदय निरोगी रहावे असे वाटत असेल तर आहारात कोणत्या फळांचा समावेश करावा जाणून घ्या.
Fruits
sakal
स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि रास्पबेरीसारखी फळे अँटिऑक्सिडंट्सनी, विशेषतः अँथोसायनिनने (Anthocyanins), भरपूर असतात. ते सूज कमी करतात आणि हृदयविकारांपासून संरक्षण करण्यास मदत करतात.
Fruits
sakal
एवोकॅडोमध्ये असलेले निरोगी मोनोअनसॅचुरेटेड फॅट्स (Monounsaturated fats) खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवतात, जे हृदयासाठी खूप फायदेशीर मानले जातत.
Fruits
sakal
सफरचंद विद्राव्य फायबर (Soluble fiber) म्हणजेच पेक्टिनचा (Pectin) चांगला स्रोत आहे. हे फायबर कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.
Fruits
sakal
केळीमध्ये पोटॅशियम (Potassium) भरपूर प्रमाणात असते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदयाची गती सामान्य ठेवण्यास मदत करते.
Fruits
saka
लाल आणि जांभळ्या द्राक्षांमध्ये रेझवेराट्रोल (Resveratrol) नावाचे अँटिऑक्सिडंट असते, जे रक्तवाहिन्यांचे संरक्षण करते आणि रक्ताच्या गुठळ्या (Blood Clots) तयार होण्यापासून रोखते.
Fruits
sakal
पपईमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई सारखी शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स असतात. यामध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यासही मदत करते.
Fruits
sakal
कलिंगड लायकोपीनचा (Lycopene) चांगला स्रोत आहे, जे हृदयविकार कमी करण्यास मदत करते.
Fruits
sakal
जरी टोमॅटोला भाजी मानले जात असले, तरी ते एक फळ आहे. टोमॅटोमध्येही लायकोपीन (Lycopene) भरपूर असते. संशोधनानुसार, लायकोपीनने समृद्ध आहारामुळे हृदयरोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.
Fruits
sakal
health benefits of ginger
Sakal