रात्रीच्या जेवणात करा 'या' ६ पदार्थांचा समावेश; झोप आणि पचन दोन्ही राहील उत्तम

Anushka Tapshalkar

मूग डाळ
मूग डाळ पचायला अतिशय हलकी असते. रात्री भात किंवा चपातीसोबत तिचे सेवन केल्यास पोटावर ताण येत नाही आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासही मदत होऊ शकते.

Moong Dal

|

sakal

पनीर
कमी मसाल्यांमध्ये तयार केलेले ग्रील्ड किंवा हलके परतलेले पनीर रात्रीच्या जेवणासाठी चांगला पर्याय आहे. यात भरपूर प्रथिने असल्याने स्नायूंना पोषण मिळते.

Paneer

|

sakal

इडली
फर्मेन्टेड असल्यामुळे इडली सहज पचते. सांबार आणि चटणीसोबत खाल्ल्यास ती पौष्टिक, हलकी आणि रात्रीसाठी योग्य ठरते.

idli

| sakal

दुधी भोपळा
दुधी भोपळ्यात पाण्याचे प्रमाण जास्त आणि कॅलरी कमी असतात. त्याची भाजी किंवा सूप रात्री शरीराला हायड्रेट ठेवण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करते.

Bottle Gourd

|

sakal

दलिया
फायबरने समृद्ध असलेला दलिया भाज्यांसोबत खाल्ल्यास बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे रात्री उशिरा भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

Daliya| Oatmeal

|

sakal

खिचडी
मुगाची डाळ आणि तांदळाची साधी खिचडी पोटासाठी अतिशय हलकी असते. तूप किंवा दह्यासोबत खाल्ल्यास तिचे पौष्टिक मूल्य वाढते आणि शांत झोपेसाठीही ती चांगला पर्याय ठरते.

Moong Dal Khichdi

|

sakal

रात्री उशिरा भूक लागल्यावर काय खावं? पचनासाठी बेस्ट पर्याय

What to Eat When Hungry at Night

|

sakal

आणखी वाचा