रात्री उशिरा भूक लागल्यावर काय खावं? पचनासाठी बेस्ट पर्याय

Anushka Tapshalkar

रात्री उशिरा भूक लागली तर काय खावे?

हलके, कमी कॅलरी, प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थ खा. यामुळे पचन सुरळीत राहते आणि शांत झोप लागण्यास मदत होते.

Late Night Snacking

|

sakal

दूध आणि ओट्स

कोमट दूध किंवा ओट्स हा उत्तम पर्याय आहे. दुधातील ट्रिप्टोफॅन झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकतो.

Oats and Milk

|

Sakal

केळी आणि बदाम

केळीसोबत काही बदाम खाल्ल्यास पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मिळते. यामुळे स्नायूंना आराम मिळून भूकही शांत होते.

Banana and Almonds

|

sakal

मखाना आणि राजगिऱ्याच्या लाह्या

भाजलेले मखाने किंवा राजगिऱ्याच्या लाह्या पचायला हलक्या असतात. चिप्स किंवा बिस्किटांऐवजी हा अधिक पौष्टिक पर्याय ठरतो.

Makhana

| sakal

ग्रीक योगर्ट किंवा दही

साधे दही किंवा ग्रीक योगर्ट प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. ते पोट भरल्याची भावना देऊन पचनालाही मदत करते.

Greek Yoghurt | sakal

फायबरयुक्त फळे

सफरचंद किंवा नाशपातीसारखी फळे रात्रीच्या भुकेसाठी योग्य आहेत. ती पचनास मदत करतात आणि अनावश्यक कॅलरी वाढवत नाहीत.

Fibrous Fruits

| sakal

हे पदार्थ टाळा

मध्यरात्री जंकफूड, तळलेले, मसालेदार आणि जास्त गोड पदार्थ खाणे टाळा. यामुळे ॲसिडिटी, छातीत जळजळ आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो.

Avoid Junk Food | sakal

रात्रीच्या शांत झोपेसाठी योग्य उशी कशी निवडावी?

How to Choose the Right Pillow for Better Sleep

|

sakal

आणखी वाचा