'हे' भारतीय स्ट्रीट फूड्स आरोग्याच्या दृष्टिने चांगले

Anushka Tapshalkar

पौष्टिक भारतीय स्ट्रीट फूड

स्ट्रीट फूडचा विचार केला तर दरवेळेस अस्वच्छ ठिकाणी बनलेले आणि आरोग्यासाठी चांगले नसलेले अन्न डोळ्यांसमोर येते. पण असे अनेक भारतीय स्ट्रीट फूड आहेत जे पौष्टिक आहेत. चला तर मग जाणून घेऊया...

Indian Street Food | sakal

शंकरकंदी चाट

हा चाट उकडलेल्या रताळ्यांवर मीठ, मिरपूड, जिरेपूड, चाट मसाला, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून तयार केला जातो.

Shakarkandi Chaat | sakal

भेळपुरी

उकडलेल्या बटाटयाच्या फोडी, मसाले, कांदा, हिरवी मिरची, लिंबाचा रस, कोथिंबीर, शेव, पुरी आणि मुरमुरे एकत्र करून तयार केलेला हा कुरकुरीत नाश्ता आहे.

Bhelpuri | sakal

चणा चाट

प्रथिने, फायबर आणि आवश्यक पोषक तत्वांनी भरपूर, काळा चना चाट चवदार आणि अति-आरोग्यदायी आहे. परंतु , स्वच्छता आणि मीठाचे प्रमाण यांची काळजी घेणे आवश्यक आहे.

Chana Chaat | sakal

इडली

तांदूळ, उडीद डाळ, मेथीदाणे, आणि मीठ यांचे आंबवलेलया पिठापासून बनवलेली इडली पचायला हलकी परंतु जास्त काळ पोट भरलेल ठेवणारी असते.

Idli | sakal

भेळ

ताजे टोमॅटो, कांदा, शेव, बुंदी आणि मसाल्यांनी बनवलेल्या मुरमुरा भेळमध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबर आणि आवश्यक जीवनसत्त्वांचा चांगला स्रोत असतो. फक्त ते कमी खमंग असले पाहिजे.

Bhel | sakal

उकडलेली अंडी

मुख्य बाजारात किंवा रस्त्याच्या बाजूला, तुम्हाला उकडलेले अंडी विकणारे विक्रेते सहज सापडतील.

Boiled Eggs | sakal

फ्रुट चाट किंवा फ्रुट प्लेट

जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध फळांचा चाट किंवा मिक्स फ्रुट प्लेट भारतीय बाजारपेठांमध्ये किंवा रस्त्यावर जागोजागी कुठेही उपलब्ध होतात.

Fruit Chaat | sakal

काकडी

उन्हाळ्यात, संपूर्ण देशभरात ठिकठिकाणी काकडी, कैरी असे हायड्रेटिंग फळे हमखास उपलुब्ध असतात.

Cucumber | sakal

व्हेज सँडविच

भारतात बऱ्याच ठिकाणी इन्स्टंट व्हेज सँडविचेस बनवून मिळतात. त्यामुळे या स्ट्रीट फूड्समधून अनेक पोषणमूल्यांचा सेवन केले जाते.

Veg Sandwich | sakal

रात्रीचा भात शिल्लक आहे? 'ही' सोपी व्हेज फ्राइड राइस रेसिपी नक्की ट्राय करा

Veg Fried Rice | sakal
आणखी वाचा