मैद्याशिवाय बनवा कुरकुरीत रवा पिझ्झा; पाहा सोपी रेसिपी!

सकाळ डिजिटल टीम

मैद्याला सुट्टी, बनवा रव्याचा पिझ्झा

मुलांना बाहेरचा पिझ्झा खूप आवडतो. पण मैद्यामुळे पचनाचा त्रास आणि लठ्ठपणा वाढू शकतो. म्हणूनच आरोग्याची काळजी घेत घरीच रव्यापासून टेस्टी पिझ्झा बनवा.

Healthy Rava Pizza Recipe

|

sakal 

कमी वेळेत तयार

हा पिझ्झा बनवण्यासाठी मैदा तासनतास भिजवण्याची किंवा यीस्ट वापरण्याची अजिबात गरज नाही. कमी साहित्यात आणि अत्यंत सोप्या पद्धतीने हा तयार होतो.

Healthy Rava Pizza Recipe

|

sakal 

पिझ्झा बेससाठी साहित्य

१ कप रवा, १/३ चमचा मीठ, १/३ चमचा बेकिंग पावडर, १/४ चमचा बेकिंग सोडा, १ छोटा चमचा साखर, १ कप ताजे दही, आवश्यकतेनुसार बटर किंवा तेल.

Healthy Rava Pizza Recipe

|

sakal 

टॉपिंगसाठी साहित्य

१ कांदा, अर्धी वाटी शिमला मिरची, अर्धी वाटी टोमॅटो, अर्धी वाटी पनीर, पिझ्झा सॉस, चीज, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, ऑलिव्ह आणि काळी मिरी पूड.

Healthy Rava Pizza Recipe

|

sakal 

पिझ्झाचे मऊ पीठ

रवा, मीठ, बेकिंग पावडर आणि सोडा एकत्र फिरवून घ्या. त्यात दही व साखर घालून घट्ट पीठ मळा. १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा, ज्यामुळे रवा छान फुलेल.

Healthy Rava Pizza Recipe

|

sakal 

ताज्या भाज्या हलक्या फ्राय

पॅनमध्ये बटर गरम करून कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, पनीर आणि ऑलिव्ह हलके परतून घ्या. त्यावर थोडे मीठ आणि काळी मिरी पूड भुरभुरा.

Healthy Rava Pizza Recipe

|

sakal 

पिझ्झा बेस

पिठाची जाडसर पोळी लाटा व काट्याच्या चमच्याने टोचा. नॉन-स्टिक पॅनवर बटर लावून बेस दोन्ही बाजूंनी हलका शेकून घ्या.

Healthy Rava Pizza Recipe

|

sakal 

चीज मेल्ट करा आणि सर्व्ह करा

बेसला पिझ्झा सॉस, चीज आणि भाज्यांचे टॉपिंग लावा. पॅन झाकून मंद आचेवर १० मिनिटे चीज वितळेपर्यंत वाफवून घ्या. गरमागरम पिझ्झा तयार आहे.

Healthy Rava Pizza Recipe

|

sakal 

उपवासाचा राजगिरा रोज खाल्ला तर शरीरात काय घडेल?

Benefits of Eating Rajgira Daily

|

sakal 

आणखी वाचा