Healthy Moringa Paratha Recipe : PM मोदींच्या फिटेनेसचे रहस्य! प्रतिकारशक्ती वाढवणारा 'शेवग्याचा पराठा' कसा बनवायचा? पाहा सोपी रेसिपी

बाळकृष्ण मधाळे

शेवग्याची पाने आरोग्यासाठी फायदेशीर

शेवग्याची पाने पोषक तत्त्वांनी समृद्ध असल्यामुळे त्यांचा आहारात समावेश करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

Healthy Moringa Paratha Recipe

|

esakal

पंतप्रधान मोदींना आवडतो शेवग्याचा पराठा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विविध प्रसंगी शेवग्याच्या पराठ्याचा उल्लेख आवडत्या पदार्थांपैकी एक म्हणून केला आहे.

Healthy Moringa Paratha Recipe

|

esakal

शेवगा पोषक तत्त्वांनी समृद्ध

लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेली शेवग्याची पाने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि शरीराला आवश्यक पोषण देण्यास मदत करतात. चला, घरच्या घरी हा स्वादिष्ट आणि पौष्टिक पराठा कसा बनवायचा ते जाणून घेऊया.

Healthy Moringa Paratha Recipe

|

esakal

साहित्य

२ कप गव्हाचे पीठ

१ कप बारीक चिरलेली शेवग्याची पाने

२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या

१/२ टीस्पून किसलेले आले

१/२ टीस्पून जिरे

१/२ टीस्पून ओवा

१/२ टीस्पून हळद

१/२ टीस्पून लाल तिखट

चवीनुसार मीठ

पराठा भाजण्यासाठी तूप किंवा तेल

Healthy Moringa Paratha Recipe

|

esakal

कृती

१. पीठ मळा

एका भांड्यात गव्हाचे पीठ, शेवग्याची बारीक चिरलेली पाने, हिरव्या मिरच्या, आले, जिरे, ओवा, हळद, लाल तिखट आणि मीठ एकत्र करा. आवश्यकतेनुसार पाणी घालून मऊ पीठ मळून घ्या.

Healthy Moringa Paratha Recipe

|

esakal

२. पेस्टचाही पर्याय

शेवग्याची पाने थोड्या पाण्यासह वाटून त्याची पेस्ट तयार करून ती पिठात मिसळू शकता. यामुळे पराठ्याला आकर्षक हिरवा रंग आणि वेगळी चव मिळते.

Healthy Moringa Paratha Recipe

|

esakal

३. पीठ मुरू द्या

मळलेले पीठ १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा. त्यामुळे पीठ मऊ होते आणि पराठे लाटणे सोपे जाते.

Healthy Moringa Paratha Recipe

|

esakal

४. पराठा लाटा

पिठाचे समान आकाराचे गोळे करून गोल किंवा त्रिकोणी आकारात पराठे लाटा.

Healthy Moringa Paratha Recipe

|

esakal

५. तव्यावर भाजा

गरम तव्यावर पराठा दोन्ही बाजूंनी भाजा. भाजताना आवश्यकतेनुसार तूप किंवा तेल लावा आणि सोनेरी रंग येईपर्यंत शिजवा.

Healthy Moringa Paratha Recipe

|

esakal

६. गरमागरम सर्व्ह करा

पौष्टिक आणि चविष्ट शेवग्याचा पराठा तयार आहे. हा पराठा हिरवी चटणी, लोणचे, दही किंवा घरच्या लोण्यासोबत गरमागरम सर्व्ह करा.

Healthy Moringa Paratha Recipe

|

esakal

शेवग्याच्या पानांचे फायदे

  • लोह आणि कॅल्शियमचा उत्तम स्रोत

  • रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत

  • शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे पुरवते

  • पचनक्रिया सुधारण्यास उपयुक्त

  • रोजच्या आहारात सहज समाविष्ट करता येणारा पौष्टिक पर्याय

Healthy Moringa Paratha Recipe

|

esakal

Moong Dal Benefits : मुगाची डाळ फक्त खिचडीसाठी नाही; आरोग्यासाठी आहेत 'हे' 10 जादूई फायदे, आजच आहारात करा समावेश!

Moong Dal Health Benefits for Daily Diet

|

esakal

येथे क्लिक करा...