Aarti Badade
कॉफीमध्ये तूप टाकून पिणे, ज्याला 'बुलेटप्रूफ कॉफी' असेही म्हणतात, हे सध्या आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी अत्यंत लोकप्रिय पेय बनले आहे.
Ghee coffee benefits
sakal
तुपातील हेल्दी फॅट्स आणि कॉफीमधील कॅफिन एकत्रितपणे शरीराचे चयापचय वाढवतात, ज्यामुळे कॅलरी जलद जळण्यास मदत होते.
Ghee coffee benefits
Sakal
तुपामध्ये 'ब्युटिरिक ॲसिड' असते, जे आतड्यांचे आरोग्य सुधारते. ही कॉफी प्यायल्याने पित्त (Acidity) कमी होण्यास मदत होते.
Ghee coffee benefits
Sakal
साध्या कॉफीपेक्षा तुपाची कॉफी शरीराला हळूहळू आणि दीर्घकाळ ऊर्जा (Energy) देते, ज्यामुळे दिवसभर थकवा जाणवत नाही.
Ghee coffee benefits
Sakal
कॉफीतील कॅफिन आणि तुपातील फॅट्समुळे मानसिक स्पष्टता आणि एकाग्रता (Mental Focus) सुधारते, जे कामाच्या ठिकाणी अधिक उत्पादक ठरते.
Ghee coffee benefits
Sakal
या कॉफीचे सेवन केल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते. यामुळे वारंवार काहीतरी खाण्याची इच्छा (Cravings) कमी होऊन वजन घटवण्यास मदत होते.
Ghee coffee benefits
Sakal
हे पेय तयार करण्यासाठी १ कप गरम ब्लॅक कॉफीमध्ये १ चमचा शुद्ध देशी तूप मिसळा आणि ते व्यवस्थित फेटून घ्या.
Ghee coffee benefits
Sakal
ही कॉफी सकाळी रिकाम्या पोटी पिणे फायदेशीर आहे. मात्र, तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा त्रास असल्यास याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
Ghee coffee benefits
Sakal
Low oxygen symptoms
sakal