Monika Shinde
वारी म्हणजे ईश्वरस्मरण, पण ती निरोगी आणि सुरक्षित व्हावी, यासाठी सुरुवात स्वतःपासून करा.
वारीत दररोज सरासरी २०-२५ किमी चालावे लागते. त्यामुळे वारीच्या आधी रोज चालण्याचा सराव करा शक्य असल्यास सकाळ-संध्याकाळ ४-५ किमी चालण्याने सुरुवात करा.
प्रवासाच्या वेळी सार्वजनिक सोयी मर्यादित असतात. त्यामुळे शरीराला ठराविक वेळी मल-मूत्र विसर्जनाची सवय लावणे आवश्यक आहे.
गरम, ताजा, हलका आणि सात्त्विक आहार घ्या. शिळे, तळलेले, आंबट पदार्थ टाळा.
रात्री मुगाची खिचडी, फळे, किंवा ताक सोबत घेणे पचनासाठी उत्तम.झोपेपूर्वी फार जड किंवा गॅस निर्माण करणारे पदार्थ टाळा.
पावसात छत्री, रेनकोट वापरा. पाय ओले राहू नयेत. इरले उपयुक्त ठरतात.
वारीत सतत मोबाईल वापरणं मन आणि मनोयोग दोन्ही विचलित करतं.
तुळस, सुंठ, वेखंड, कापूर, तीळतेल हे सहज मिळणारे औषधी उपाय आहेत.
स्वतःभोवती स्वच्छता ठेवा. ओला-कोरडा कचरा नीट विलग करा. व्याधी दूर राहतील.