पुजा बोनकिले
डिनरला काही पौष्टिक खायचे असेल तर पालक राइस बनवू शकता. घरातील सर्व सदस्यांना आवडेल.
पालक राइस बनवण्यासाठी तांदुळ, पालक आलं, टमाटर, कांदा, हिरवी मिरची, जीरा, लाल मिरची, काळे मिरी, जीरा पावडर, धनिया पावजर लागले.
सर्वात पहिले पालक पाण्याने स्वच्छ करावे. नंतर गरम पाण्यात उकळा. नंतर थंड पाण्याने धुवावे. थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करावे.
नंतर कुकरमध्ये २ चमचे तेल गरम करून त्यात जीरा, लवंग, विलायची, दालचिनी , हिरवी मिरची टाकून तडका द्यावा.
नंतर त्यात बारीक कांदा, आल-लसून पेस्ट टाका.
नंतर टमाटर, मीठ, लाल तिखट,धनिया पावडर, जीरा पावडर टाका.
नंतर पालक पेस्ट टाका. नंतर धुतलेले तांदूळ टाका.
१ कप तांदळाला दिड कप पानी मिसळा. कुकरच्या २ शिट्या झाल्या की बंद करा. तुमचा पालक राइस तयार आहे.