थकवा, सूज आणि चक्कर..; Heart Attack चा झटका येण्यापूर्वी दिसू लागतात संकेत, शरीरात कोणते बदल होतात?

सकाळ डिजिटल टीम

हृदयविकाराच्या समस्या

आजकाल हृदयविकाराच्या (Heart Attack) समस्या झपाट्याने वाढत आहेत. अनेकांना अकाली मृत्यूला सामोरे जावे लागत आहे.

Heart Attack Symptoms | esakal

महिन्याभरापूर्वीच दिसू लागतात संकेत

फार कमी वेळा असं घडतं, की हृदयविकाराचा झटका कोणत्याही लक्षणांशिवाय अचानक येतो. असे अनेक संकेत आपल्या शरीरात महिन्याभरापूर्वीच दिसू लागतात.

Heart Attack Symptoms

...तर जीव वाचवू शकतो!

दुर्दैवाने, आपण या संकेतांकडे दुर्लक्ष करतो आणि याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. चला जाणून घेऊया, हृदयविकाराची ती लक्षणे, जी वेळेवर ओळखली तर जीव वाचवू शकतात.

Heart Attack Symptoms

चक्कर येणे

  • बसताना किंवा उठताना डोळ्यासमोर अंधार पडणे, चक्कर येणे हे सामान्य नाही.

  • हृदयाच्या अशक्तपणाचे हे एक महत्त्वाचे लक्षण असू शकते.

  • याचा अर्थ हृदयातून शरीरभर योग्यरित्या रक्तपुरवठा होत नाही.

Heart Attack Symptoms

पायांना सूज येणे

  • पायांमध्ये सातत्याने सूज येणे हेही धोक्याचे लक्षण आहे.

  • याचा अर्थ रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही आणि शरीरात पाणी साचते.

  • हे हृदय निकामी होण्याचे सुरुवातीचे संकेत असू शकतात.

Heart Attack Symptoms

सतत थकवा जाणवणे

  • कोणतेही जड शारीरिक काम न करता देखील सतत थकवा जाणवणे हे हृदयाच्या कार्यक्षमतेशी निगडित आहे.

  • जेव्हा हृदय योग्य प्रमाणात रक्त आणि ऑक्सिजन स्नायूंना पोहोचवू शकत नाही, तेव्हा थकवा जाणवतो.

  • हे लक्षण गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.

Heart Attack Symptoms

हृदयतज्ज्ञांचा सल्ला घ्या

शरीर हृदयविकाराचा इशारा लवकरच देत असते. फक्त आपण त्या संकेतांकडे लक्ष देण्याची गरज आहे. यापैकी कोणतेही लक्षण सतत जाणवत असल्यास तातडीने हृदयतज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि आवश्यक तपासण्या करा.

Heart Attack Symptoms

कर्करोग रोखण्यापासून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापर्यंत..; 'हे' पान ठरतंय रामबाण उपाय!

Bay Leaves Health Benefits | esakal
येथे क्लिक करा