Aarti Badade
कामाचा व्याप, शिफ्टमधील काम किंवा सोशल मीडियाचा वापर यामुळे अनेकांना रात्री उशिरा जेवण्याची सवय लागली आहे. पण ही सवय तुमच्या आरोग्यासाठी एक 'स्लो पॉयझन' ठरू शकते.
Late night eating side effects
Sakal
आपले शरीर एका नैसर्गिक चक्रानुसार चालते. रात्री उशिरा जेवल्याने ही लय बिघडते आणि ज्या वेळी आतड्यांनी विश्रांती घेणे अपेक्षित असते, त्या वेळी त्यांना काम करावे लागते.
Late night eating side effects
Sakal
उशिरा जेवल्यामुळे पचन प्रक्रिया मंदावते. यामुळे अन्नाचे पचन नीट होत नाही, परिणामी ॲसिडिटी, गॅस, अपचन आणि पोषक तत्वांचे शोषण कमी होणे अशा समस्या उद्भवतात.
Late night eating side effects
Sakal
रात्रीच्या वेळी प्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्याने आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया कमी होतात आणि हानिकारक बॅक्टेरिया वाढतात. या असंतुलनाला 'डिस्बायोसिस' म्हणतात.
Late night eating side effects
Sakal
संशोधनानुसार, रात्री उशिरा खाण्याची सवय केवळ लठ्ठपणाच नाही, तर 'मूड डिसऑर्डर' आणि आयबीएस (IBS) सारख्या आजारांना निमंत्रण देते.
Late night eating side effects
sakal
भरल्या पोटी झोपल्यामुळे झोपेची गुणवत्ता खालावते. यामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते, ज्यामुळे सतत थकवा जाणवतो आणि वजन वेगाने वाढू लागते.
Late night eating side effects
Sakal
झोपण्यापूर्वी किमान २ ते ३ तास आधी जेवण पूर्ण करा. आहारात फायबरयुक्त फळे, भाज्या आणि डाळींचा समावेश करा. प्रक्रिया केलेले अन्न टाळून ताजे अन्न खा.
Late night eating side effects
Sakal
आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आहारात दही, ताक आणि आंबवलेल्या पदार्थांचा समावेश करा. भरपूर पाणी प्या आणि आपल्या नैसर्गिक शरीरचक्राचा आदर करा.
Late night eating side effects
Sakal
Hernia Symptoms
Sakal