Saisimran Ghashi
असे काही ड्रायफ्रूट्स आहेत शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलकमी करून रक्तवाहिन्या आणि हृदय निरोगी ठेवतात.
या 3 ड्रायफ्रूट मधील पोटॅशियम, मॅग्नेशियम, आणि फायबर उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवून हार्ट अटॅकचा धोका कमी करतात.
बदामामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स, फायबर, आणि मॅग्नेशियम भरपूर असते. हे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवून हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. रोज ४–५ बदाम खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.
अखरोट हे हृदयासाठी सर्वाधिक उपयुक्त ड्रायफ्रूट मानले जाते. यामध्ये ओमेगा-3, अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवतात व हार्ट अटॅकपासून संरक्षण करतात.
खजूरात पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे रक्तदाब नियंत्रित ठेवतात आणि हृदयावरचा ताण कमी करतात. मधुमेही व्यक्तींनी प्रमाणात खाणे फायदेशीर ठरते.
सकाळी उपाशी पोटी किंवा संध्याकाळी स्नॅक्स म्हणून हे ड्रायफ्रूट्स खाल्ल्यास त्याचा अधिक चांगला परिणाम दिसून येतो. मात्र, प्रमाणातच सेवन करणे आवश्यक आहे.
काही व्यक्तींना ड्रायफ्रूट्सची अॅलर्जी असू शकते किंवा ते विशिष्ट औषधांशी प्रतिक्रिया देऊ शकतात, त्यामुळे नियमित सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.