Saisimran Ghashi
मूत्रपिंडातील पेशी अनियंत्रित वाढू लागल्यास गाठ तयार होते, यालाच किडनी कॅन्सर म्हणतात. यातील सर्वात सामान्य प्रकार म्हणजे रेनल सेल कार्सिनोमा (RCC).
धूम्रपान करणारे, जास्त मद्यपान करणारे, लठ्ठ लोक, उच्च रक्तदाब असणारे, किडनी कॅन्सरचा कौटुंबिक इतिहास असणारे, दीर्घकाळ डायलिसिस घेणारे आणि औद्योगिक रसायनांच्या संपर्कात असणाऱ्यांना धोका जास्त असतो.
किडनी कॅन्सरची सुरुवात बहुतेक वेळा कोणत्याही ठळक लक्षणांशिवाय होते. गाठ मोठी होईपर्यंत आजार निदान होत नाही.
किडनी कॅन्सरमधील सर्वात सामान्य आणि सुरुवातीचं लक्षण म्हणजे लघवीमध्ये रक्त येणे.
विशेषतः एका बाजूला सतत पाठदुखी जाणवणे हेही एक महत्त्वाचे लक्षण असू शकते.
सहज थकवा येणे, भूक न लागणे, व वजन अचानक कमी होणे ही इतर लक्षणे असतात.
सौम्य ताप येणे आणि हाडांमध्ये वेदना जाणवणे देखील कधी कधी किडनी कॅन्सरशी संबंधित असते.
योग्य वेळी निदान आणि उपचार केल्यास किडनी निकामी होण्याचा धोका टाळता येतो.