Saisimran Ghashi
हल्ली लोकांमध्ये हृदयरोग आणि हार्ट अटॅकचा धोका वाढत चालला आहे.
हार्ट अटॅक येण्यापूर्वी काही दिवस शरीरात त्याची लक्षणे जाणवू लागतात.
सतत छातीत दुखणे हे देखील हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते.
श्वास अपुरा पडणे, अचानक धाप लागणे हे हार्ट अटॅकपूर्वीचे लक्षण असते.
मान दुखणे, पाठीत दुखणे ही देखील धोक्याची घंटा असते.
अचानक थकवा जाणवून जास्त घाम येत असल्यास सावध व्हा.
हृदयाचे कमी जास्त ठोके पडणे हे देखील हृदयाच्या झटक्या पूर्वीची धोक्याची घंटा असते.
तुम्हाला ही लक्षणे जाणवत असल्यास वेळीस सावध व्हा आणि आरोग्य तपासणी करून घ्या.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.