हार्ट अटॅक अचानक येत नाही; 2 दिवस शरीर देतं ‘हे’ संकेत!

Aarti Badade

हार्ट अटॅक अचानक येत नाही!

अनेकांना वाटते की हार्ट अटॅक अचानक येतो, परंतु तज्ज्ञांच्या मते, शरीर २४ ते ४८ तास आधीच काही धोक्याचे इशारे देऊ लागते.

Heart attack symptoms before 48 hours

|

Sakal

रक्तप्रवाहात अडथळा

जेव्हा हृदयाच्या स्नायूंपर्यंत जाणारा रक्तप्रवाह रक्ताच्या गाठींमुळे किंवा प्लॅकमुळे कमी होतो, तेव्हा शरीर अस्वस्थतेचे संकेत देऊ लागते.

Heart attack symptoms before 48 hours

|

Sakal

विनाकारण येणारा अतिथकवा

कोणतेही जड काम न करता शरीर पूर्णपणे थकलेले वाटणे हे हृदय योग्य प्रकारे रक्त पंप करू शकत नसल्याचे लक्षण आहे.

Heart attack symptoms before 48 hours

|

Sakal

श्वास घेण्यास अडचण

हृदयाला पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यास श्वास घेताना त्रास होऊ लागतो. हे लक्षण हार्ट अटॅक येण्याच्या काही तास आधी प्रकर्षाने जाणवते.

Heart attack symptoms before 48 hours

|

Sakal

अपचन की हार्ट अटॅक?

मळमळ, पोट फुगणे किंवा वरच्या पोटात दुखणे या लक्षणांना अनेकजण 'गॅस' समजून दुर्लक्ष करतात, पण हे हार्ट अटॅकचे पूर्वसंकेत असू शकतात.

Heart attack symptoms before 48 hours

|

Sakal

छातीत सततची जळजळ

छातीत जळजळ होणे किंवा अस्वस्थ वाटणे ही लक्षणे विशेषतः महिलांमध्ये जास्त दिसून येतात. याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

Heart attack symptoms before 48 hours

|

sakal

झोप न येणे आणि अस्वस्थता

हार्ट अटॅक येण्यापूर्वीच्या ४८ तासांत अचानक अस्वस्थ वाटणे, विनाकारण टेन्शन येणे किंवा रात्रीची झोप उडणे अशा समस्या जाणवू शकतात.

Heart attack symptoms before 48 hours

|

sakal

वेळेत उपचार, वाचवू शकतो जीव!

जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला ही लक्षणे दिसत असतील, तर विलंब न करता डॉक्टरांशी संपर्क साधा. वेळीच निदान जीव वाचवू शकते.

Heart attack symptoms before 48 hours

|

Sakal

शरीराच्या ‘या’ 7 वेदना साध्या समजू नका; गंभीर आजारांचे असू शकतात इशारे!

Warning signs of serious diseases

|

Sakal

येथे क्लिक करा