Saisimran Ghashi
बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या हृदयरोग रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
अनेकदा रुग्ण क्षुल्लक आजाराकडे दुर्लक्ष करतात; मात्र हृदयरोगाशी संबंधित लक्षणांकडे लगेच लक्ष दिल्यास पुढील धोका टाळता येतो.
हे हृदयरोगाचे सर्वसामान्य लक्षण आहे. सामान्यतः आराम करताना किंवा काही तरी काम करताना अचानक छातीत दुखू लागते. छातीतील वेदना शरीराच्या डाव्या बाजूला पसरत जातात.
काही रुग्णांना सातत्याने अपचन, पोटदुखी होत असल्यास ते हृदयरोगाचे लक्षण असू शकते.
अचानक रुग्णाला घाम सुटून चक्कर येते. सातत्याने जाणवणारी अस्वस्थतादेखील चक्कर येण्यास कारणीभूत ठरू शकते.
अनेकजणांना झोपेत घोरण्याची सवय असते. त्याकडे आपण बऱ्याचदा दुर्लक्ष करतो; मात्र घोरण्यामुळे हृदयरोगाशी संबंधित आजार होण्याची दाट शक्यता असते.
अनेक दिवसांपासून असलेल्या खोकल्यामुळे क्षयरोगाव्यतिरिक्त हृदयरोग होण्याचीही दाट शक्यता असते.
शरीराला व्यवस्थित रक्तपुरवठा न झाल्यास सूज येते. सातत्याने हालचाल होणाऱ्या अवयवांना विशेषतः हात, पाय, गुडघ्यावर सूज येते.