सकाळ डिजिटल टीम
हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि रक्तदाब, तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी जीवनशैलीसोबत आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. आपल्या स्वयंपाकघरात आणि फळबाजारात सहज उपलब्ध असणारे काही पदार्थ नियमित सेवनात घेतल्यास हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतो. जाणून घ्या या १० सुपरफूड्सबद्दल...
काळ्या द्राक्षांमधील रेझवेराट्रोल सारखे अँटीऑक्सिडंट्स वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करतात आणि हृदयाच्या रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवतात.
ग्रीन टीमध्ये कॅटेचिन आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारतात.
सफरचंदांमध्ये असलेले फायबर आणि पॉलीफेनॉल बीपी नियंत्रित ठेवतात, तसेच धमन्यांमधील कोलेस्ट्रॉल कमी करतात.
नाशपातीमध्ये असलेले पोटॅशियम हृदयाची गती संतुलित ठेवते आणि रक्तदाब स्थिर ठेवण्यास मदत करते.
ताजी फळे शरीराला आवश्यक विटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स देतात, ज्यामुळे हृदयाची कार्यक्षमता सुधारते.
काकडी, टोमॅटो आणि गाजर यांसारख्या भाज्यांमध्ये फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, जे हृदयासाठी लाभदायक आहेत.
ओट्स खाल्ल्याने LDL कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि रक्तवाहिन्यांमधील प्रवाह सुधारतो.
स्ट्रॉबेरीतील अँटीऑक्सिडंट्स धमन्यांमधील जळजळ कमी करतात व हृदयविकाराचा धोका कमी करतात.
कमी चरबीयुक्त दुधात कॅल्शियम आणि प्रथिने भरपूर असतात, ज्यामुळे हृदयाचे स्नायू बळकट होतात.
हिरव्या पालेभाज्यांमध्ये नैसर्गिक नायट्रेट्स असतात, जे रक्तदाब कमी करण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.