पुजा बोनकिले
मुंबईत २००६ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानं देश हादरला होता.
पश्चिम रेल्वेवर सात ठिकाणी ११ जुलै २००६ रोजी सायंकाळी ६.२० वाजल्यापासून स्फोट झाले.
स्फोटांमध्ये १८० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालेला तर ४०० पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले होते.
माटुंगा रोड स्थानकात उपनगरी गाडीत झालेल्या बाँबस्फोटानंतर वाहतूक बंद करण्यास आल्याने लोहमार्गावरून चालत निघालेले प्रवासी
माहीम स्थानकात उपनगरी गाडीत झालेला स्फोट इतका शक्तिशाली होता, की रेल्वे स्थानकाच्या छताचीही दुसवस्था झाली
माहीम रेल्वे स्थानकात बाँबस्फोट झाल्यानंतर पाहणी करण्यासाठी गृहमंत्री आरआर पाटील आले होते.
माहीम रेल्वे स्थानकात गाडीच्या डब्यात स्फोट झाल्यानंतर जखमी व्यक्तीला तातडीच्या उपचारासाठी रूग्णालयात नेताना स्थानिक कार्यकर्त
जोगेश्वरी स्थानकातील उपनगरी गाडीत झालेल्या स्फोटामुळे डब्याच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या होत्या