वेदना एकच, धोका वेगळा! तज्ज्ञ सांगतात अ‍ॅसिडिटी की हार्ट अटॅक?

Aarti Badade

छातीत वेदना आणि गोंधळ

आजकाल अ‍ॅसिडिटी आणि हृदयरोगाचे प्रमाण वाढले आहे. छातीत होणारी वेदना ॲसिडिटीची आहे की हार्ट अटॅकची, हे ओळखणे अत्यंत आवश्यक आहे.

Acidity vs Heart Attack

|

Sakal

ॲसिडिटीची लक्षणे

ॲसिडिटीची मुख्य लक्षणे : छातीत जळजळ (जेवणानंतर/उपाशी पोटी), आंबट ढेकर येणे, पोटात दुखणे आणि पोट फुगणे.

Acidity vs Heart Attack

|

Sakal

ॲसिडिटीत मिळणारा आराम

ॲसिडिटीची वेदना बहुतेक वेळा पाणी प्यायल्यानंतर, ॲन्टासिड गोळी घेतल्यानंतर किंवा ढेकर पास झाल्यावर लगेच नाहीशी होते.

Acidity vs Heart Attack

|

Sakal

हार्ट अटॅकची लक्षणे

हार्ट अटॅकच्या लक्षणांमध्ये छातीच्या मध्यभागी तीव्र दाब, जडपणा किंवा छाती चिरडल्यासारखी वेदना जाणवते.

Acidity vs Heart Attack

|

Sakal

वेदना प्रसार

हार्ट अटॅकची वेदना हात, मान, खांदा किंवा जबड्याकडे पसरू शकते. यासोबतच घाम येणे, उलटी होणे, श्वास घ्यायला त्रास होतो.

Acidity vs Heart Attack

|

Sakal

महत्त्वाचा सिग्नल (फरक)

ॲन्टासिड घेतल्यानंतर हार्ट अटॅकच्या लक्षणांमध्ये आराम मिळत नाही. ॲसिडिटीमध्ये जळजळ होते, तर हार्ट अटॅकमध्ये तीव्र दाब आणि घुसमट होते.

Acidity vs Heart Attack

|

Sakal

कार्डियाक इमर्जन्सी

जर छातीतील अस्वस्थता १० मिनिटांपेक्षा जास्त टिकली आणि श्वास घ्यायला त्रास, खूप घाम किंवा डावा हात दुखत असेल, तर ही कार्डियाक इमर्जन्सी असू शकते. त्वरित ईसीजी करा.

Acidity vs Heart Attack

|

Sakal

सततचा थकवा? शरीर देतंय ब्लड कॅन्सरचे इशारे! ही 9 लक्षणे वेळेत ओळखा

Blood Cancer Symptoms & Diagnosis

|

Sakal

येथे क्लिक करा