पावसाला हलक्यात घेऊ नका.!

Monika Lonkar –Kumbhar

पाऊस

देशातील अनेक भागांमध्ये सध्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. 

Heavy Rain

महाराष्ट्र

महाराष्ट्रातही मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून मुंबई, कोकणासह इतर जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Heavy Rain

आजार

पावसाळ्यात अनेक आजारांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे, पावसात भिजल्यास काय काळजी घ्यायची? ते जाणून घेऊयात.

टॉवेल

पावसात भिजल्यानंतर सर्वात आधी तुमचे ओले कपडे काढून तुमचे शरीर टॉवेलच्या मदतीने पूर्णपणे कोरडे करून घ्या.

ओले कपडे लगेच बदला

पावसात भिजल्यानंतर ओले कपडे घालणे टाळा. ते कपडे लगेच बदला. 

आराम करा

पावसात भिजल्यानंतर थोडी विश्रांती घ्या. तुमचे शरीर ऊबदार ठेवण्यासाठी ब्लॅंकेट घेऊन झोपा.

गरम अन्नाचे सेवन करा

पावसात भिजल्यानंतर नेहमी गरम अन्नाचे सेवन करणे, महत्वाचे आहे. कारण, शरीर ऊबदार ठेवण्यासाठी गरम अन्नाचे सेवन करणे फायद्याचे ठरते.

गरम पाणी अवश्य प्या

पावसाळ्यात खरं तर सर्वांनी गरम पाणी पिणे गरजेचे आहे. यामुळे, विविध संसर्गांपासून बचाव होण्यास मदत होते.

पावसाळ्यात शरीर डिटॉक्स करण्यासाठी 'या' हेल्दी ड्रिंक्सचा करा आहारात समावेश

Monsoon Body Detox | esakal