Shubham Banubakode
शिमला आणि मनालीमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते आहे.
जवळपास १० वर्षांनंतर ख्रिसमसदरम्यान ही बर्फवृष्टी होते आहे.
या बर्फवृष्टीमुळे पर्यंटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
रोहतांग, बरला आणि शिंकुला या उंच्च शिखरांवर एक फुटपर्यंत बर्फ साचला आहे.
याशिवाय शिमल्यात पाच इंच, कुफरीमध्ये नऊ इंच, जुहाह सलोनी आणि जोतमध्ये प्रत्येकी दीड इंच बर्फ साचला आहे.
शिमल्यात या महिन्यात १५ सेमी. बर्फवृष्टी झाली आहे.
यापूर्वी २०१४ मध्ये हिमाचल प्रदेशमध्ये २९ सेंमी बर्फवृष्टी झाली होती.
पर्यटक या बर्फवृष्टीचा आनंद घेत आहेत.
मंगळवारी बर्फवृष्टीमुळे काही वेळासाठी अटल टनेल बंद करण्यात आला होता.
जवळपास ४ हजार पर्यटक मनाली आणि लाहौल स्पितीमध्ये अडकले होते. त्यांनी सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
बर्फवृष्टीमुळे शिमल्यावरून नरकांडा जाणारा राष्ट्रीय महामार्ग ५ बंद करण्यात आला आहे.
काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.