Shubham Banubakode
आचार्य रजनीश उर्फ ओशो यांचे आजही जगभरात लाखो चाहते आहेत.
अनेक जण त्यांचे व्हिडिओ ऐकतात आणि पुस्तकेही वाचतात.
ओशोंबद्दल लोकांमध्ये एक कुतूहल आहे. ओशोंना काही जण 'सेक्सगुरू' म्हणत असत...
पण त्यावर ओशो यांची प्रतिक्रिया नेमकी काय होती?
याचा एक किस्सा त्याचे शिष्य पीपल बाबा यांनी सांगितला आहे.
पीपल बाबा यांचे खरे नाव आझाद जैन आहे, त्यांनी ओशोंबरोबर चार वर्ष घालवली आहेत.
ते म्हणाले, ज्यावेळी त्यांनी महागडी गाडी घेतली, तेव्हा मीडियामध्ये त्यांच्याबद्दल बरंच नाही बोललं गेलं.
पण ओशोंना हे सगळं आवडत होतं, ते म्हणायचे, मी आजर्यंत महावीर, बुद्ध, जीजस, कबीर यांच्यावर बोललो पण कुणी दखल घेतली नाही.
आज मी रोल्स रॉयस घेतली, तेव्हा जगभरातील मीडिया माझ्याकडे आला.
मला श्रीमंतांचा गुरु आणि सेक्सगुरु म्हणण्यात आलं. हाच मनुष्याचा स्वभाव आहे.
पण माझ्याविषयी जे काही बोललं जातं, ते मला आवडतं.
पीपील बाबा म्हणाले, ओशो लैंगिकतेबाबत बोलत असतील, तर त्यात चुकीचं काय?
आपल्या सगळ्यांचा जन्म लैंगिकतेपासूनच झाला आहे. मग त्यात गैर काय?
ओशोंनी आम्हा सगळ्यांचा लैंगिकतेबाबतचा दृष्टीकोन बदलला आहे.