Yashwant Kshirsagar
टाचदुखी ही तर बहुतांश लोकांमध्ये विशेषत: महिलांमध्ये अतिशय सामान्य समस्या असल्याचे दिसते.
टाचा दुखल्या तरी आपण त्याकडे म्हणावे तसे लक्ष देत नाही. पण कालांतराने ही समस्या मोठी होत जाते आणि आपले जगणे अवघड करते.
चला तर मग आज टाचा दुखण्याच्या कारणाविषयी जाणून घेऊया.
टाचेला जास्त ताण येणाऱ्या चपला किंवा सॅंडलचा वापर केल्याने टाचा दुखू शकतात.
लठ्ठपणा असल्यास पायावर जास्त वजन पडल्याने टाचांना वेदना होतात.
सतत ऊभे राहिल्याने किंवा चालण्यानेही टाचा दुखतात
शरीरात कॅल्शिअम, व्हिटामिन डी आणि इतर पोषक घटकांची कमतरता असेल तर टाचा दुखतात
प्लांटर फॅसिआयटिस नावाचा त्रास झाल्यासही टाचा दुखतात.
चुकीच्या पद्धतीने पाय ठेवणे किंवा चालणे यामुळेही टाचा दुखू शकतात.