हेलिकॉप्टर बैज्या नाव कसं पडलं? कितीला खरेदी? काय खातो?

सूरज यादव

श्रीनाथ केसरी

सांगलीत श्रीनाथ केसरी स्पर्धेत हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेक फेल जोडीनं पहिला क्रमांक मिळवत फॉर्च्युनर पटकावलीय. सध्या हेलिकॉप्टर बैज्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

Helicopter Baijya Name, Price and Diet

|

Esakal

दीडशेपेक्षा जास्त मैदान

शिरोळमधील बाळू दादा हजारे यांच्या मालकीच्या हेलिकॉप्टर बैज्यानं आजपर्यंत एकूण कोट्यवधींची बक्षीसं जिंकली आहेत. चार वर्षात त्यानं दीडशेपेक्षा जास्त मैदानात भाग घेतलाय.

Helicopter Baijya Name, Price and Diet

|

Esakal

कोट्यवधींची बक्षीसं

ट्रॅक्टर, थार आणि आता फॉर्च्युनर गाडीही बैज्यानं जिंकलीय. याशिवाय लाखोंची बक्षीसं असलेली मैदानं मारली आहेत. तर गदा जिंकल्यात आणि मानाच्या मैदानात नंबर मारलाय

Helicopter Baijya Name, Price and Diet

|

Esakal

हरण्यासोबत विक्रम

जनरलला पळणाऱ्या बैलांसोबत पळालाय. हरण्याबरोबर वर्षभर पळालाय. दोन्ही बैलांनी दोन-तीन वेळा वगळता वर्षभर पहिलाच नंबर काढलाय. बैज्याच्या देखभालीसाठी दोघं-तिघं जण असतात.

Helicopter Baijya Name, Price and Diet

|

Esakal

औताला जुंपतात

बाळू हजारे सांगतात की, सोमवारी बैलांना औताला जुंपत नाही. शर्यतीचा बैल औतात घटवायला लागतो. बैज्याला एकदिवस आड अर्धा तास औताला जुंपला जातो.

Helicopter Baijya Name, Price and Diet

|

Esakal

खायला काय घातलं जातं?

बैज्याला खायला काही वेगळं घातलं जात नाही. चारा, जनावराचं नेहमीचं खाद्यं दिलं जातं. काय घालेल ते खातो. काही बैलांना दूध पाजलं जातं पण बैज्याला दूध पाजलं जात नाही.

Helicopter Baijya Name, Price and Diet

|

Esakal

हेलिकॉप्टर नाव कसं पडलं?

बैज्या तुफान पळतोय आणि हेलिकॉप्टरसारखा जातोय म्हणून तसं नाव पोरांनीच ठेवलं एकानं नाव टाकलं ते सगळ्यांनी हेलिकॉप्टर बैज्या म्हणायला चालू केलं.

Helicopter Baijya Name, Price and Diet

|

Esakal

किती रुपयांना खरेदी

हेलिकॉप्टर बैजाचे मालक शेतकरी असून ते गावचे सरपंचसुद्धा आहेत. त्यांचा दुधाचा टँकर आणि चिलिंग प्लांट आहे. साडे सहा लाख रुपयांना त्यांनी बैज्याची खरेदी केली होती.

Helicopter Baijya Name, Price and Diet

|

Esakal

नद्यांमधून वाहतं सोनं, भारतासह जगातील ५ नद्या आहेत प्रसिद्ध

Golden Rivers Around the World

इथं क्लिक करा