नद्यांमधून वाहतं सोनं, भारतासह जगातील ५ नद्या आहेत प्रसिद्ध

सूरज यादव

नदीत सोनं

सोन्याचे दर आता गगनाला भिडले आहेत. सोन्याचे दागिने घालण्याची हौस अनेकांना असते. सोशल मीडियावर तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील ज्यात लाकडी प्लेट किंवा एखाद्या वस्तूच्या सहाय्यानं नदीच्या वाळूतून सोनं काढलं जातं.

Golden Rivers Around the World

|

Esakal

जगात अनेक नद्या

वाहत्या पाण्यातले दगड चाळणं किंवा मातीत गाडल्या गेलेले सोनेरी कण गोळा करणं हे दिसायला सोपं असलं तरी त्यात बरेच कष्ट लागतात. पण जगात अशा अनेक नद्या आहेत ज्यातून खरेखुरे सोन्याचे कण वाहतात.

Golden Rivers Around the World

|

Esakal

स्वर्णरेखा नदी

भारतात झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशातून वाहणारी स्वर्णरेखा नदी प्रसिद्ध आहे. स्थानिक लोक या नदीत सोन्याचा शोध घेतात. नदी काठच्या लोकांचा उदरनिर्वाह या नदीत सापडणाऱ्या सोन्यावर व्हायचा असं म्हटलं जातं.

Golden Rivers Around the World

|

Esakal

सुबनसिरी नदी

अरुणाचल प्रदेशातील सुबनसिरी नदीतही आदिवासी समुदाय मातीत सोनं शोधतो. पारंपरिक पद्धतीनं हे सोनं वेचलं जातं आणि त्यावर उदरनिर्वाहसुद्धा केला जातो.

Golden Rivers Around the World

|

Esakal

मिसौरी नदी

भारताशिवाय जगातही अशा नद्या आहेत. अमेरिकेत मिसौरी नदी १९व्या शतकात सोन्यासाठी प्रसिद्ध होती. गोल्ड रशवेळी नदीत सोनं सापडल्यानं हजारो लोकांचं आयुष्य बदललं होतं.

Golden Rivers Around the World

|

Esakal

बिग होल नदी

मोंटानातील बिग होल नदीतही सोन्याचे कण सापडतात. इतिहासात याचा उल्लेख असून मोठ्या प्रमाणावर सोन्याचे कण मिळाले आहेत.

Golden Rivers Around the World

|

Esakal

क्लोंडाइक नदी

कॅनडातील क्लोंडाइक नदीतही १९व्या शतकाच्या अखेरीस सोन्याचे कण सापडले होते. नदीच्या तळात सापडलेल्या सोन्याच्या कणांमुळे अनेकजण रातोरात श्रीमंत झाले होते.

Golden Rivers Around the World

|

Esakal

सोनं शोधण्याची पद्धत

नद्यांमध्ये सोनं सहज सापडत नाही. त्यासाठी धाडस, तंत्र आणि अनुभवाची गरज असते. पाणी आणि माती सतत चाळावं लागतं, धुवावं लागतं. त्यानंतर सोन्याचे कण हाती लागतात.

Golden Rivers Around the World

|

Esakal

जगातल्या सर्वात पहिल्या आणि दुर्मिळ वस्तू पाहिल्यात का? फक्त १०० नव्हे तर १० हजार वर्षे जुने.. एकदा पाहाच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

world's first watch photo

|

esakal

इथं क्लिक करा