Mayur Ratnaparkhe
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे तीन दिवसांपूर्वी निधन झाले, यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीसह त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर आता त्यांची पत्नी हेमा मालिनी यांनी काही फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिलाय.
हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या फोटोसह भावनिक पोस्ट शेअर केल्या आहेत.
हेमा मालिनी यांनी या पोस्ट आणि फोटोंमधून धर्मेंद्र यांच्यवरील त्यांचे निखळ प्रेम प्रकट केल्याचे दिसते.
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचे लग्न २१ ऑगस्ट १९७९ रोजी झाले होते.
विशेष म्हणजे त्यावेळी धर्मेंद्र हे आधीच विवाहित होते आणि घटस्फोट घेऊ शकत नव्हते.
यामुळे त्यांनी लग्नापूर्वी इस्लाम धर्म स्वीकारला आणि दिलावर खान व आयशा बी अशी नवीन नावे धारण केली.
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना दोन मुली आहेत, अहाना आणि ईशा.
Cardamom Health
esakal