Aarti Badade
जेव्हा शरीराच्या स्नायूंच्या कमकुवत भिंतीतून एखादा अंतर्गत अवयव (सहसा आतडे) बाहेरच्या बाजूला ढकलला जातो, तेव्हा त्याला 'हर्निया' (Hernia) म्हणतात.
Hernia Symptoms
Sakal
हर्नियाचे सर्वात स्पष्ट लक्षण म्हणजे पोट किंवा मांडीच्या (Groin) भागात त्वचेखाली दिसणारा फुगवटा किंवा गाठ. झोपल्यावर ही गाठ अनेकदा अदृश्य होते किंवा आत जाते.
Hernia Symptoms
Sakal
जड वस्तू उचलताना, खोकताना, वाकताना किंवा जास्त वेळ उभे राहिल्यावर फुगवट्याच्या ठिकाणी तीव्र वेदना, ओढ लागल्यासारखे वाटणे किंवा जडपणा जाणवू शकतो.
Hernia Symptoms
Sakal
हा हर्निया मांडीच्या सांध्यात (Groin) होतो. पुरुषांमध्ये याचे प्रमाण जास्त असून, यामुळे अंडकोषात वेदना किंवा सूज जाणवू शकते.
Hernia Symptoms
Sakal
हा पोटाच्या वरच्या भागात होतो. याची लक्षणे वेगळी असतात; जसे की छातीत जळजळ (Acid Reflux), आंबट ढेकर येणे आणि अन्न गिळताना त्रास होणे.
Hernia Symptoms
Sakal
जर हर्नियाची गाठ आत जात नसेल आणि त्या भागाचा रक्तपुरवठा खंडित झाला, तर तो जीवघेणा ठरू शकतो. अशा वेळी मळमळ, उलट्या आणि तीव्र वेदना होतात.
Hernia Symptoms
sakal
जर हर्नियाची गाठ लाल किंवा जांभळी पडली असेल, असह्य वेदना होत असतील आणि गॅस किंवा शौचास अडथळा येत असेल, तर विलंब न करता हॉस्पिटल गाठावे.
Hernia Symptoms
Sakal
हर्निया औषधांनी बरा होत नाही; अनेकदा शस्त्रक्रिया (Surgery) हाच यावरचा कायमस्वरूपी उपाय असतो. लक्षणे दिसताच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे सुरक्षित ठरते.
Hernia Symptoms
Sakal
Colon cancer diet Superfoods for gut health
Sakal