Hero Flex Fuel Bike : पेट्रोलपेक्षा जास्त इथेनॉलवर चालणाऱ्या बाइक, गडकरींच्या हस्ते लाँच

सूरज यादव

Hero Flex Fuel BikeHeroची घोषणा

Hero MotoCorp ने भारतातील पहिल्या 100cc Flex Fuel मोटरसायकली सादर केल्या आहेत. Splendor+ Flex Fuel आणि HF Deluxe Flex Fuel यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

Hero Flex Fuel Bike

|

Esakal

Flex Fuel म्हणजे काय?

या बाइक्स E20 ते E85 इथेनॉल मिश्रित इंधनावर धावू शकतात. त्यामुळे पेट्रोलवरील अवलंबित्व कमी होण्यासोबतच प्रदूषणातही घट होणार आहे.

Hero Flex Fuel Bike

|

Esakal

Splendor+ किंमत

Hero Splendor+ Flex Fuel ची एक्स-शोरूम किंमत ₹82,710 ठेवण्यात आली आहे. ही बाइक जुलै 2026 पासून निवडक बाजारात उपलब्ध होणार आहे.

Hero Flex Fuel Bike

|

Esakal

Splendor+ Flex Fuel

97.2cc इंजिन, E85 इंधनावर 6.3 kW पॉवर आणि 8.3 Nm टॉर्क निर्माण करते. कंपनीच्या मते, ही बाइक स्टँडर्ड मॉडेलपेक्षा अधिक चांगली कामगिरी करते.

Hero Flex Fuel Bike

|

Esakal

स्मार्ट फीचर्स

बाइकमध्ये Hero ची i3S Start-Stop Technology, डिजी-अनालॉग मीटर, साइड स्टँड इंजिन कट-ऑफ आणि ट्यूबलेस टायर्स देण्यात आले आहेत. इथेनॉलमुळे इंधन खर्चातही बचत होऊ शकते.

Hero Flex Fuel Bike

|

Esakal

HF Deluxe किंमत

Hero HF Deluxe Flex Fuel ची एक्स-शोरूम किंमत ₹72,792 ठेवण्यात आली आहे. ही देशातील सर्वात स्वस्त Flex Fuel बाइक्सपैकी एक ठरणार आहे.

Hero Flex Fuel Bike

|

Esakal

HF Deluxe फीचर्स

97.2cc इंजिन, E20 ते E85 इंधन सपोर्ट, डिजी-अनालॉग क्लस्टर, साइड स्टँड कट-ऑफ, अपडेटेड ECU आणि नवीन ब्लॅक-लाइम यलो ग्राफिक्स यामुळे ही बाइक अधिक आकर्षक बनली आहे.

Hero Flex Fuel Bike

|

Esakal

फायदा

जुलै 2026 पासून दिल्ली आणि महाराष्ट्रातील निवडक भागांत विक्री सुरू होणार आहे. इथेनॉल वापरामुळे पेट्रोलचा खर्च कमी होण्यास मदत होईल, तसेच शेतकरी आणि पर्यावरणालाही फायदा होणार आहे.

Hero Flex Fuel Bike

|

Esakal

10:10 वेळेची सुरुवात कुणी केली आणि जगाने तीच पद्धत का स्वीकारली? जुन्या ट्रेंडची ऐतिहासिक कहाणी

10:10 Time

|

ESakal

इथं क्लिक करा