Pranali Kodre
जास्वंदीचं झाडं बऱ्याच जणांच्या बागेत असतं. विविध रंगांची जास्वंदीची झालं असतात, त्याची फुलं अनेकदा देवतांनाही वाहिली जातात.
Hibiscus plant care
Sakal
पण, जास्वंदाच्या (Hibiscus) झाडाला कीड लागणे ही खूप सामान्य समस्या असून जास्वंदाच्या रसाळ पानांमुळे आणि फुलांमुळे कीटक त्याकडे आकर्षित होतात.
Hibiscus plant care
Sakal
जास्वंदीला सर्वाधिक पडणारी कीड म्हणजे म्हणजे पांढरी कापसा दिसणारी मिलीबग्स (Mealybugs), जे पानांमधील आणि कळ्यांमधील रस शोषून घेतात.
Hibiscus plant care
Sakal
याशिवाय मावा (Aphids), पांढरी माशी (White Fly) आणि लाल कोळी (Spider Mites) हे किडेही जास्वंदीच्या झाडावर पाहायला मिळतात.
Hibiscus plant care
Sakal
जास्वंदीला कीड लागण्याची प्रमुळ कारणे म्हणजे जास्त ओलावा, कमी सूर्यप्रकाश, झाडाभोवतालची खराब हवा, वेळेवर छाटणी न करणे आणि झाडाची कमकुवत वाढ.
Hibiscus plant care
Sakal
कीड घालवण्यासाठी काही घरगुती उपाय करता येऊ शकतात.
Hibiscus plant care
Sakal
एक लिटर कोमट पाण्यास १ चमचा कडुनिंबाचे तेल, अर्धा चमचा लिक्विड डिशवॉश किंवा शॅम्पू, हे मिश्रण स्प्रे बॉलटमध्ये भरून आठवड्यातून दोनदा झाडावर विशेषत: पानांच्या मागच्या बाजूला फवारा. पण हा स्प्रे संध्याकाळी करणे उत्तम.
Hibiscus plant care
Sakal
एक लिटर पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा आणि काही थेंब खोबरे तेल हे मिश्रणही प्रभावी ठरते.
Hibiscus plant care
Sakal
१०-१२ लसणाच्या पाकळ्या आणि ४-५ हिरव्या मिरच्या वाटून घेऊन एक लिटर पाण्यात मिसळा. रात्रभप हे मिश्रण झाकून ठेवून गाळून घ्या. नंतर हे मिश्रण आठवड्यातून एकदा झाडावर फवारता येते.
Hibiscus plant care
Sakal
जास्वंदीचं झाल निरोगी राहण्यासाठी त्याला पुरेशा सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्या. तसेच नियमित छाटणी करा, सुकलेली फुलं काढा, योग्य पाणी द्या.
Hibiscus plant care
Sakal
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Hibiscus plant care
Sakal
Rose Plant Care
Sakal