गुलाबाला फुले येत नाहीत? मग करा हे सोपे उपाय

Pranali Kodre

गुलाबाचे रोप

प्रत्येकाच्या घरी एक रोप असतेच ते म्हणजे गुलाब. पण अनेकदा गुलाबाच्या रोपाला हवी तशी फुलं येतं नाहीत.

Rose Plant Care

|

Sakal

सूर्यप्रकाश

गुलाबाच्या रोपाला ५-६ तास सूर्याप्रकाशाची गरज असते, सावलीत रोप ठेवल्याने वाढ कमी होते आणि फुलं कमी येतात. सकाळचा सूर्यप्रकाश गुलाबासाठी उत्तम असतो.

Rose Plant Care

|

Sakal

अंड्याचे टरफल

अंड्याचे टरफल बारीक चुरा करून मातीत मिसळा, ज्यामुळे कॅल्शियम मिळाल्याने झाड मजबूत होते आणि फुलांची गुणवत्ताही सुधारते. महिन्यातून एक दोन वेळा वापरा.

Rose Plant Care

|

Sakal

केळीचे साल

केळीच्या सालीचे बारीक तुकडे करून पाण्यात 2-3 भिजवून ते पाणी गाळून झाडांना द्या. ज्यामुळे पोटाशियम मिळतं. यामुळे कळा जास्त येतात. महिन्यातून एक-दोन वापरा.

Rose Plant Care

|

Sakal

चहापत्ती आणि कॉफीचा चोथा

चहापत्ती आणि कॉफीचा चोथा थोडा वाळवून वापरता येतो. पण त्याचं प्रमाण कमी ठेवा. यामुळे माती सुपीक होते आणि झाडाची नवीन वाढ चांगली होते.

Rose Plant Care

|

Sakal

सुकलेली फुलं काढा

सुकलेली फुलं काढून टाका आणि ते फुल ज्या देठाला जोडलेले आहे, त्याच्या वरून थोडे कापा. यामुळे झाडाची वाचलेली ऊर्जा नवीन कळ्यांसाठी वापरली जाते.

Rose Plant Care

|

Sakal

मुळांजवळ खोलवर पाणी

मुळांजवळ खोलवर योग्य पाणी टाका. पाणी फार साचू देऊ नका, त्यामुळे मुळे कुजतात आणि पानांवर फार पाणी मारल्याने बुरशीजन्य रोग होण्याचा धोका वाढतो.

Rose Plant Care

|

Sakal

नियमित छाटणी

नियमित छाटणी केल्याने झाड फुलते.

Rose Plant Care

|

Sakal

इप्सम सॉल्ट

जर गुलाबाचे झाड खूप जुने झाले असेल बाजारातून 'इप्सम सॉल्ट' (Epsom Salt - Magnesium Sulfate) आणून ते १ चमचा १ लिटर पाण्यात विरघळवा आणि महिन्यातून एकदा मातीत टाका. याचा फायदा होऊ शकतो.

Rose Plant Care

|

Sakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Rose Plant Care

|

Sakal

तुळस लवकर सुकण्याची ५ मुख्य कारणे

Mistakes That Kill Your Tulsi Plant Fast

|

Sakal

येथे क्लिक करा