Shubham Banubakode
उचकी म्हणजे डायफ्रामचा अचानक होणारं आकुंचन होय. त्यानंतर घशातील स्वरयंत्र क्षणभर बंद होतं आणि तोंडातून ‘हिक’ असा आवाज येतो.
Hiccups Meaning
esakal
आपली आठवण कुणी काढली म्हणून उचकी लागते, याला वैज्ञानिक पुरावा नाही. हा आपल्या समाजात वर्षानुवर्षे सांगितला जाणारा गैरसमज आहे.
Hiccups Meaning
esakal
भरपूर किंवा घाईघाईने जेवणं, फसफसणारी पेय पिणं, अचानक तापमान बदलणं किंवा तोंडातून जास्त हवा जाणं यामुळे उचकी लागू शकते.
Hiccups Meaning
esakal
अचानक हसणं, उत्साह वाढणं, तणाव किंवा घाबरणं यामुळेही उचकी सुरू होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक उचकीचा संबंध आठवणीशी नसतो.
Hiccups Meaning
esakal
साधारणपणे उचकी काही मिनिटांत स्वतःहून थांबते. अधूनमधून उचकी येणं सामान्य मानलं जातं आणि त्यासाठी घाबरण्याचं कारण नसतं.
Hiccups Meaning
esakal
उचकी दोन दिवसांपेक्षा जास्त वेळ सुरू राहिली, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरतं. कधी कधी त्यामागे आरोग्याशी संबंधित कारण असू शकतात.
Hiccups Meaning
esakal
उचकी लागल्यावर थंड पाणी हळूहळू पिणं, थोडा वेळ श्वास रोखणं किंवा गुडघे छातीजवळ घेऊन पुढे झुकणं, चिमुटभर साखर खाणं, यामुळे आराम मिळू शकतो.
Hiccups Meaning
esakal
कुणीतरी आपली आठवण काढतंय म्हणून उचकी लागते, असं विज्ञान सांगत नाही. त्यामुळे हा गैरसमज आहे, याला वैज्ञानिक पुरावा नाही.
Hiccups Meaning
esakal
train rules
esakal